विनयभंगप्रकरणी दुबईत भारतीय सेल्समनला अटक; पोलिसांनी जप्त केला पासपोर्ट

दुबई - दुबईत काम करत असलेल्या एका भारतीय सेल्समनला दुबई पोलिसांनी विनभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. या सेल्समनने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. दुबईतील एका मॉलमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी सेल्समनचा पासपोर्ट दुबई पोलिसांनी जप्त केला आहे. पीडित तरुणी ही १५ वर्षीय असून आरोपी सेल्समन हा या मॉलमध्ये मागील काही महिन्यांपासून काम करत होता. या अटक सेल्समनने आपला गुन्हा मान्य केला आहे. आरोपी सेल्समन हा ३१ वर्षीय आहे. मागील काही महिन्यांपासून तो दुबईतील मॉलमधील दुकानात सेल्समनचे काम करत होता. घटनेच्या दिवशी पीडित तरुणीची आई देखील या दुकानात होती. पीडित तरुणीची आई मॉलमध्ये भेटलेल्या ओळखीच्या व्यक्तीशी बोलण्यात व्यग्र असताना आरोपी सेल्समनने तिच्या मुलीला एका कोपऱ्यात नेले आणि ड्रेसचं बटण लावण्याच्या बहाण्याने अश्लील स्पर्श केला. हा संबंध प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी तरुणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून दुबई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.Most Popular News of this Week

Iskcon temple pc

Iskcon temple pc

मशहूर टीवी एक्ट्रेस श्वेता...

मशहूर टीवी एक्ट्रेस श्वेता तिवारी के पति अभिनव कोहली को पुलिस ने...

Iskcon temple pc