अजित डोवाल यांना ‘राफेल डील'चा अधिकार होता का?, काँग्रेसचा सवाल

नवी दिल्ली : राफेल डीलवर एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना काँग्रेसने पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावले आहेत. राफेल सौद्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून मोदी सरकारच्या ३६ राफेलची किंमत युपीएच्या १२६ विमानांएवढी असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. 

काँग्रेसने आज राफेल करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुरजेवाला यांनी चौकीदाराची चोरी पकडली गेल्याचा दावा केला. मोदींनी भारताच्या तिजोरीला चुना लावला आहे.  इंडियन निगोसिएशन टीमनुसार (आयएनटी) ३६ राफेल विमानांची किंमत युरो ८४६० दशलक्ष डॉलर बनते. आज युरोची किंमत ८० रुपये आहे. तेव्हाचे ७५ रुपये युरोमागे पकडले तर ही किंमत ६३ हजार ४५० कोटी रुपये होते. मोदी हीच किंमत ७८९० दशलक्ष डॉलर ५९ हजार कोटी रुपये सांगत फिरत आहेत.

मोदींनी युपीएच्या काळातील राफेल विमानांची किंमत तब्बल ३५० पटींनी वाढविली. युपीए सरकारने राफेल विमानांमध्ये जी प्रणाली विचारात घेतली होती, तीच प्रणाली मोदींच्या राफेल विमानांमध्ये आहे. यात कोणताही बदल केलेला नाही. काँग्रेसच्या १२६ विमाने खरेदी करताना तंत्रज्ञान हस्तांतरणही नमूद होते. मात्र, मोदींनी ३६ विमानांच्या खरेदीमध्ये  तंत्रज्ञान हस्तांतरणालाही बगल दिली आहे. उरलेल्या विमानांनंतर हे हस्तांतरण होणार आहे आणि यासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे, असा आरोप सुरजेवाला यांनी केला. यातील १० हजार कोटी रुपये दसॉल्ट कंपनीला देण्यात आले आहेत. 

३६ विमाने खरेदी करण्याचा निर्णय १२, १३ जानेवारी २०१६ मध्ये अजित डोवालद्वारा प्रâान्समध्ये घेण्यात आला. इंडियन निगोसिएशन टीमने हा निर्णय घेतला नाही. १३ जानेवारीलाच करार करण्यात आला. २०१७ मध्ये आलेल्या टिप्पणीमुळे खळबळ माजली होती. पंतप्रधानांनी यावर दबाव आणला आणि पंतप्रधान कार्यालयाने कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचा खुलासा केला होता. मात्र, आयएनटीच्या अहवालात अंतिम डील आयएनटीने केलीच नसल्याचे म्हटले आहे, असा दावा सुरजेवाला यांनी केला. तसेच जर डोवाल यांनी डील केली तर त्यांना अधिकार होता का? नाही. याचाच अर्थ मोदींच्या प्याद्यांनी हे काम केले. मोदींनी अधिकाराचा गैरवापर करत सरकारी खजिन्याला चुना लावला असल्याचा गंभीर आरोप सुरजेवाला यांनी केला.



Most Popular News of this Week

प्रकाश अंबेडकर के प्रस्ताव पर...

प्रकाश अंबेडकर के प्रस्ताव पर कांग्रेस एक कदम आगे, पवार और ठाकरे अंबेडकर का...

बार में काम करनेवाले कामगार...

बार में काम करनेवाले कामगार की हत्यानवी मुंबई। नवी मुंबई के जुहूगांव के एक...

होली मनाने गांव जाने वाले...

होली मनाने गांव जाने वाले यात्रियों की दिखी भीड़,नवी मुंबई। होली और रंगपंचमी...

हापुस के नाम पर ग्राहकों के...

हापुस के नाम पर ग्राहकों के साथ लूट, कार्यवाई की मांगनवी मुंबई। वाशी स्थित...

मनपा एंव विसपुते कॉलेज के...

मनपा एंव विसपुते कॉलेज के संयुक्त सहयोग से अपशिष्ट से टिकाऊ...

आचार संहिता का उल्लंघन करने...

आचार संहिता का उल्लंघन करने पर पनवेल में मामला दर्ज पनवेल। चुनाव आयोग...