हैडलाइन

कोविड वैद्यकीय व्यवस्थापनावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

कोविड वैद्यकीय व्यवस्थापनावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई दि 11 : वैद्यकीय विद्यार्थी आणि वैद्यकीय व्यावसायिकांना कोविड आजाराविषयी संदर्भ म्हणून उपयुक्त असलेल्या " मेडिकल मॅनेजमेंट ऑफ कोव्हीड 19- दि एमसीजीम एक्सपिरीयन्स ( Medical Management of Covid 19 The MCGM experiance) या पुस्तकाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विमोचन केले.यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती सभापती यशवंत जाधव, टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशी, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अधिष्ठाता डॉ मोहन जोशी, डॉ रमेश भारमल, डॉ आलोक शर्मा उपस्थित होते. विमोचन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपायुक्त सुरेश काकाणी यांनी केले.या पुस्तकात कोविडच्या सर्वसामान्य आढाव्याशिवाय वैज्ञानिक दृष्टीकोन, रोगनिदान पैलू, उपचार व व्यवस्थापन, विशेष सहाय्यक पैलू,अद्ययावत संशोधन आणि नवीन उपचार प्रणाली असे विभाग आहेत
हे व्यापक पुस्तक कोविड विषयक अभ्यासासाठी व संदर्भाकरिता सर्वांना उपयुक्त ठरेल असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

Most Popular News of this Week