हैडलाइन

राजा येथील ऐतिहासिक वास्तू विकासासाठी सर्वंकष बृहत् आराखडा सिंदखेड तयार करा

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे बुलढाणा जिल्हा प्रशासनाला निर्देश


मुंबई, दिनांक १०: सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने या स्थळाचे आगळेवेगळे महत्व आहे.  येथील ऐतिहासिक वास्तूंचे महत्व लक्षात घेऊन त्याच्या विकासासाठी सर्वंकष बृहत् आराखडा तयार करावा. जिल्हास्तरीय समितीने विविध विभागांशी चर्चा करून विविध विकास कामांचा अंतर्भाव असलेला परिपूर्ण विकास आराखडा राज्यस्तरीय समितीकडे पाठवावा, असे निर्देश  राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.


सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तूंच्या विकासा संदर्भात आज मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजेंद्र शिंगणे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह  बुलढाणा जिल्हा प्रशासनाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.


मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सिंदखेड राजा येथे सहा राज्य संरक्षित स्मारके आणि पाच केंद्र शासन संरक्षित स्मारके अथवा ठिकाणे आहेत. यामधे राजे लखुजी जाधव राजवाडा, निळकंठेश्वर मंदिर, राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सावकार वाडा, रंगमहाल, काळा कोट, मोती तलाव, रामेश्वर मंदिर, चांदणी तलाव, सजना बारव आदी ठिकाणांचा समावेश आहे. या स्थळांसह परिसर विकासाच्या बाबतीत एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे. या ऐतिहासिक स्थळांचे महत्व लक्षात घेतच तेथील कामांचे नियोजन  होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी स्थानिक यंत्रणांची बैठक घेऊन कार्यवाहीच्या सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.


सध्या या स्थळांच्या विकासासाठी १६८ कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. याशिवाय तेथील संग्रहालयाच्या विकास कामांचा ३४ कोटी रुपयांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, या परिसराचे आणि स्थळाचे महत्व लक्षात घेता विविध यंत्रणांच्या मदतीने एकत्रित असा  आराखडा आवश्यक आहे. त्यादृष्टीने लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


यावेळी प्रधान सचिव श्री. खारगे यांनीही जिल्हा प्रशासनाला याबाबत काही सूचना दिल्या. 0000


Most Popular News of this Week

आचार संहिता का कड़ाई से पालन...

आचार संहिता का कड़ाई से पालन करने का आयुक्त डॉ. कैलास शिंदे का निर्देशनवी...

फ्रिज खरीदने के बहाने 2 लाख 66...

फ्रिज खरीदने के बहाने 2 लाख 66 हजार की ठगीनवी मुंबई। ओएलएक्स पर फ्रिज बेचने का...

बिना पूछे दुकान की मिठाई खाने...

बिना पूछे दुकान की मिठाई खाने से युवक की पिट पिट कर हत्या, तीन गिरफ्तारनवी...

बकाए पानी बिल भुगतान अभय...

बकाए पानी बिल भुगतान अभय योजना में 16 करोड़ से अधिक की वसूलीनवी मुंबई - मनपा की...

अब नवी मुंबई में कर सकेंगे...

अब नवी मुंबई में कर सकेंगे निःशुल्क कीमोथेरेपीनवी मुंबई। नवी मुंबई शहर के...

सोमेश्वर देवस्थान के बाद अब...

       महाराष्ट्र मंदिर महासंघ द्वारा अवैध खरीद मामले को रद्द करने की...