आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील विविध ठिकाणी महाशिवरात्री निमित्त भगवान शंकराचे घेतले दर्शन....
नवी मुंबई :- महाशिवरात्री सणाचे औचित्य साधून 'बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सीबीडी येथील नागेश्वर मंदिर, आग्रोळी गाव येथील अमृतेश्वर मंदिर, सारसोळे गांव येथील बामनदेव मंदिर अशा विविध मंदिरात जाऊन भगवान श्री शिवशंकराचे दर्शन घेतले. तसेच सालाबादप्रमाणे नवी मुंबईसह देशभरातील सर्व मंदिरात महाशिवरात्री खूप उत्साहाने साजरी होत आहे. सर्व भाविकांचे दुःख-दारिद्र्य नष्ट होवो, सर्वांना सुख समृध्दी लाभो, येणारे संकट दूर होवो, सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण होवो, अशी प्रार्थना महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान श्री शिवशंकराला केल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी श्री भगवान शंकराचे दर्शन घेणे एक अत्यंत शुभ आणि आध्यात्मिक अनुभव असतो. शिवरात्रीचा दिवस भगवान शंकराची पूजा, ध्यान, उपवासा आणि विविध धार्मिक कर्मे करण्याचा आहे. या दिवशी भक्त जप, तप, अभिषेक व रात्रभर जागरण करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी विविध ठिकाणी जाऊन शंकराचे दर्शन घेणे, त्याच्या आशीर्वादाचा अनुभव घेणे एक अत्यंत अद्भुत अनुभव असतो. प्रत्येक स्थानाची त्याच्या वातावरणाशी, त्या ठिकाणी असलेल्या शंकराच्या मूर्तीच्या सौंदर्याशी आणि पवित्रतेशी एक वेगळी छटा असते. हे दिव्य दिवस आपल्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी आणि आत्मशुद्धतेसाठी खूप महत्त्वाचे असतात. आज या शुभदिनी नवी मुंबईतील विविध ठिकाणी जाऊन भगवान शंकराच्या पवित्र स्थानी नतमस्तक होऊन भगवान शंकराची पूजा अर्चा करून माझे मन प्रसन्न झाल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत समाजसेवक सुधीर पाटील, माऊली कोळी, सुरेश कोळी, ज्ञानेश्वर कोळी, कैलास कोळी, किरण वर्मा, शीतल जगदाळे, सचिन निळे, बामनकर ताई, निलेश म्हात्रे, ज्योती पाटील, चंद्रकांत पाटील, मनोज म्हात्रे, मनोज मेहेर यांच्यासह असंख्य भाविक भक्त, शिव मंदिराचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.