हैडलाइन

दुष्काळाबाबत केंद्र व राज्यसरकार गंभीर नाही- शरद पवार

मुंबई,  राज्यात दुष्काळाबाबत केंद्र सरकारची मदत मागत असताना वस्तुस्थिती काय आहे हे केंद्राला सांगायला लागत आहे आणि तेव्हा केंद्रसरकार पथक पाठवत आहे. त्यामुळे केंद्र व राज्यसरकार याबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
 नाशिकमधील माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे या भाजपच्या नेत्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी मिडियाने दुष्काळी पथकाच्या दौऱ्याबाबत विचारले असता शरद पवार यांनी केंद्र आणि राज्याच्या दुष्काळी प्रश्नाबाबत असलेल्या अनास्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
 दुष्काळ पाहणीसाठी आलेले पथक रात्रीची पाहणी करत आहे. राज्य सरकार हव्या त्या योजना करताना दिसत नाही असे सांगतानाच आघाडी सरकार होते तेव्हा मी स्वतः दुष्काळी भागाचा दौरा केला होता. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी तातडीने मदत केली होती. मात्र हे सरकार दुष्काळप्रश्नी गंभीर नाही असे दिसत आहे असेही शरद पवार म्हणाले.


Most Popular News of this Week