हैडलाइन

शिरवणेत विविध धार्मिक कार्यक्रम

शिरवणेत विविध धार्मिक कार्यक्रम

स्वयंभू गणेश मंदिर वर्धापन व पालखी सोहळा 


नवी  मुंबई  : शिरवणे येथील श्रीगणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने शिरवणे येथील  श्री स्वयंभू गणेश मंदिराचा 15 वा वर्धापन दिन आणि पालखी सोहळा  शुक्रवार व शनिवार रोजी विविध धार्मिक, विधिवत पूजापाठ करून साजरा केला जाणार असल्याचे माजी महापौर व ट्रस्टचे सचिव जयवंत सुतार यांनी सांगितले.

        शुक्रवारी सकाळपासून श्री गणेश याग प्रारंभ, मुख्यदेवता , अग्नी, नवग्रह देवता स्थापना तसेच विविध धार्मिक पूजापाठ विधिवत होणार आहेत. सायंकाळी गावदेवी प्रासादिक भजन मंडळ,( रोहिंजन ) सुनिल पाटील बुवा यांचे सुश्राव्य भजन तर रात्रौ हभप शारदाताई सूर्यवंशी -जाधव (नाशिक) यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.

    त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी  सकाळी विविध धार्मिक पूजा आणि महाआरती, दुपारी श्री विष्णूलक्ष्मी प्रासादिक महिला भजन मंडळ ( दापोली-पारगाव) गायिका कुमारी स्नेहल पाटील  यांचे सुश्राव्य  भजन  तर  दुपारी ठाणे -बेलापूर पंचक्रोशीतून स्वयंभू  गणेश दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.

       त्यानंतर सायंकाळी  हनुमान प्रासादिक भजन मंडळ, शिरवणे बुवा नंदकुमार सुतार व  देवेंद्र पवार यांचे भजन होणार असून  सायंकाळी श्री गणेश पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव ठाकूर, सचिव जयवंत सुतार यांनी कळविले आहे.


Most Popular News of this Week

प्रियदर्शिनी पार्कमध्ये योग...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रोज दोन तास योगा करतात मी सुद्धा रोज अर्धा तास...

जय पवार यांची मान्सूनच्या...

महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि...

कोविडनंतर रोजगार गमावलेल्या...

मुंबई मध्ये गेली १३५ वर्ष डबेवाला कामगार वर्ग काम करतो आहे. परंतू कोव्हिड व...

मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड....

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना मुंबई बाहेर न जाता मुंबईत समायोजन करा,...

मुंद्रा से मुंबई-गोवा समेत 8...

अडानी मुंद्रा एयरपोर्ट ने स्टार एयर के साथ रणनीतिक साझेदारी करते हुए मुंबई...

महानगरपालिका आरोग्य...

महानगरपालिका रुग्णालयांमधील रुग्णसेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि...