बेस्ट उपक्रम व जसलोक हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने '' सौरसत्व '' नावाने महिलांसाठी व्हिटामिन ''D'' मोफत तपासणी आणि औषधे वितरण अभियान चा शुभारंभ बेस्ट कामगार वसाहत, परळ येथे करण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी बेस्ट समिती अध्यक्ष नगरसेवक श्री अनिल पाटणकर, बेस्ट समिती सदस्य, नगरसेवक श्री अनिल कोकीळ, मुख्य वैद्यकीय अधिकारी श्री अनिल कुमार सिंघल, जसलोक हाॅस्पिटलचे श्री निखील कुलकर्णी, शाखाप्रमुख श्री किरण तावडे व वसाहतीतील रहिवास्यांची उपस्थित होते.