जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका मुख्यालयात जनजागृतीपर प्रदर्शन

जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका मुख्यालयात जनजागृतीपर प्रदर्शन


मुंबई: जागतिक तंबाखू विरोधी दिन उद्या ३१ मे २०२२ रोजी साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तंबाखू व व्यसनमुक्ती विषयक जनजागृतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपाहारगृहात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे सहआयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मिलीन सावंत यांनी  आज  उद्घाटन केले. 


याप्रसंगी महानगरपालिकेचे प्रमुख कामगार अधिकारी श्री. सहदेव मोहिते, सहप्रमुख कामगार अधिकारी श्री. नितीन बडगुजर यांच्यासह नशाबंदी मंडळातर्फे मिलिंद पाटील, रवींद्र गमरे, अशोक लांडगे, प्रियांका सवाखंडे व दिशा कळंबे यांचीही उपस्थिती होती. 


बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, कामगार विभाग, महाराष्ट्र राज्य शासनाचा उपक्रम असलेले नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तंबाखूच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम, त्यापासून जगाला असलेला धोका याविषयी सचित्र माहिती देणारे तसेच तंबाखू प्रतिबंधासाठी असणाऱया कायद्याची माहिती, तंबाखूजन्य पदार्थ व विक्री कायदा २००३ चा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी इत्यादींबाबत या प्रदर्शनातून माहिती देण्यात आली आहे. 

याप्रसंगी सहआयुक्त श्री. मिलीन सावंत यांनी उपस्थित सर्व अधिकारी - कर्मचाऱयांना व्यसनांपासून लांब राहण्याची तसेच व्यसनमुक्तीची शपथ देखील दिली. 


सहआयुक्त श्री. मिलीन सावंत यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ३१ मे रोजी जगभर साजऱया केल्या जाणाऱया तंबाखू विरोधी दिवसाचे महत्त्व आजच्या काळात अत्याधिक आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे की, जर तंबाखूचे व्यसन वेळीच थांबविले नाही तर सन २०३० पर्यंत जगातील तब्बल शंभर कोटी लोक तंबाखू व तत्सम व्यसनांपासून होणाऱया रोगांमुळे जीवाला मुकण्याची शक्यता आहे. त्यामध्ये २० ते ३० वर्षे वयोगटातील ४० टक्के लोक असू शकतात. तंबाखूचा हा हल्ला रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वतः व्यसनापासून दूर राहतानाच आपल्या कौटुंबिक परिघात, मित्र-मंडळींनाही व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. ते आपले कर्तव्य आहे, असे श्री. सावंत यांनी नमूद केले. 



Most Popular News of this Week

राहुल शेवाळे यांना प्रभू...

राहुल शेवाळे यांना प्रभू श्रीरामाचा आयोध्येतून खास आशीर्वादअयोध्येतील...

मुकेश अंबानी ने श्री...

मुकेश अंबानी ने श्री सिद्धिविनायक बाप्पा का लिया दर्शन●कपिलदेव...

दुर्गा माता मंदिर कुर्ला में...

दुर्गा माता मंदिर कुर्ला में नवरात्रि उत्सव सम्पन्न मुंबई: विगत 30 वर्षों...

राहुल शेवाळे यांनी घेतली राज...

राहुल शेवाळे यांनी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेटशिवतीर्थ निवासस्थानी...

भाजपा का संकल्प अगले 5 वर्षों...

भाजपा का संकल्प अगले 5 वर्षों तक मुफ्त राशन, गैस कनेक्‍शन और PM सूर्य घर से...

बीजेपी से निलंबित पूर्व...

बीजेपी से निलंबित पूर्व नगरसेविका ठाकरे गुट की शिवसेना में शामिलपनवेल।...