जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त उपनगरातील पत्रकारांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन
●ग्लोबल चक्र डेस्क
मुंबई- वर्ल्ड हायपरटेन्शन लीगच्या वतीने दरवर्षी १७ मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळता जातो. आपल्या रक्तवाहिन्यामधून वेगाने रक्त पुढे जाताना रक्तवाहिन्यांच्या आवरणावर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब होय. या आजाराविषयीचे दुष्परिणाम लक्षात घेता या आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळला जातो. याच दिनाचे औचित्य साधून घाटकोपर येथील झायानोवा शाल्बी हॉस्पिटलतर्फे उपनगरात राहत असलेल्या पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात घाटकोएर, विक्रोळी, चेंबूर, कुर्ला या विभागामध्ये राहणाऱ्या पत्रकार बंधू भगिनींनी सहभाग घेतला होता. रक्ताची सखील तपासणी, किडनी तसेच हृदयविकार( ईसीजी ) तपासणी, रक्त शर्करा , उच्च रक्तदाब, तसेच तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन असे या शिबीराचे स्वरूप होते. याविषयी अधिक माहिती देताना झायानोवा शाल्बी हॉस्पिटलतर्फे सेल्स व विपणन प्रमुख आशिष शर्मा म्हणाले, " उच्च रक्तदाब हा विकार कोणतेही लक्षण प्रकट न करता शरीरात कधी निर्माण होतो हे कळत नसल्याने याला सायलेंट किलर असे संबोधले जाते. सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला उच्च रक्तदाब आहे याची कल्पनाच अनेकांना नसते. कामाच्या व्यापामुळे पत्रकारांना नियमित तपासणी करणे जमत नाही तसेच मुंबई उपनगरात नियमित अनेक राजकीय, धार्मिक तसेच शैक्षणिक कार्यक्रमांची रेलचेल असते त्यामुळे त्यांचे जेवण योग्य वेळी होते नाही तसेच अपुरी झोप झाल्यामुळे अनेकांना मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास होत असतो परंतु तो वेळेवर लक्षात आला तर त्यावर उपाय करणे सोपे जाते म्ह्णूनच आम्ही या उच्च रक्तदाब दिनानिमित्त हा उपक्रम राबविला आहे आम्ही वर्षातून दोन वेळा उपनगरात राहणाऱ्या पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करणार आहोत."
उच्च रक्तदाबाच्या पूर्वलक्षणांचे प्रमाण ६० ते ७० टक्के इतके जास्त आहे त्यामुळे वेळीच प्रतिबंध न केल्यास हे मोठे वैद्यकीय संकट ठरू शकेल. सुरुवातीपासूनच नियमित आरोग्य तपासण्या करून घेण्याने या विकाराला प्रतिबंध घालणे शक्य होईल, अशी माहिती झायानोवा शाल्बी हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिन तज्ञ डॉ उर्वी महेश्वरी यांनी दिली. उपनगर पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष आनंद श्रीवास्तव तसेच जेष्ठ पत्रकार मनोज कुलकर्णी व राज पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.