*एएआयबीच्या अहवालावर रोहित पवारांचा गंभीर आरोप; अजित पवारांच्या विमान दुर्घटनेत सीबीआय चौकशीची मागणी*

मुंबई दि. 4 मार्च

एखाद्या व्हीआयपीच्या किंवा कोणत्याही दुर्घटनेचा तपास होत असताना एजन्सीने डोळ्यात तेल घालून करण्याची गरज असते. हा रिपोर्ट बनवताना गडबड, चूका होऊ नये अपेक्षा होती. त्यांनी बारामतीला जिल्हा जाहीर केलं आहे. तपासात काही चुकता कामा नये. महापालिका आहे असं दाखवलं आहे. यातून एएआयबीचं गांभीर्य यातून दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

रोहित पवार बोलताना म्हणाले की,पंखा डाव्या बाजूला झुकला होता पण रिपोर्टमध्ये चुकलं आहे. म्हणजे गोळी कुठे लागली हे विचारलं तर डोक्यात लागली असताना यांनी छातीत लागली असं सांगितलं आहे,रिपोर्टमध्ये विमान झाडाला धडकल्याची चर्चा असताना, झाडं सांगितली आहेत. असं कुठली झाडं आहेत ज्यांना धडकून विमान खाली पडलं. विमान प़डलं तिथे झाडं नसून, झुडपालाही स्पर्श झाला नव्हता. झुडपाची उंची आणि विमान पडल्याची उंची मॅच होताना दिसत आहे. द्यायचा म्हणून रिपोर्ट दिला. झाडांवर जबाबदारी टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न यांनी केला आहे, असे रोहित पवार बोलताना म्हणाले. 

रोहित पवार म्हणाले की,तिथे काही लोकांशी बोलण्यावर समजलं आहे की, अजितदादा यांच्या विमान दुर्घटनेआधी विमानतळाची रेकी करण्यासाठी काही लोक आले होते असा दावा आहे. याचा तपास करण्याची गरज आहे. सीआयडी आणि सीआयबीने यात लक्ष घालावं,अजित पवारांचा दौरा पूर्वनियोजित नव्हता, तर रात्री ठरला होता. एकूण 90 टक्के इंधन भरलं होतं. विमानाचं आयुष्य 85 तास राहिलं आहे असं आपण म्हटलं होतं. पण खरं पाहायचं तर 8000 पर्यंत गेलं होतं. म्हणजे अधिकृत वैधतेपेक्षा 3000 तास इंजिन पुढे गेलं होतं. रनवे 29 सोडून 11 वर लँड करण्याचा प्रयत्न झाला हेदेखील सिद्ध होत आहे. मुख्य पायलट काही बोलत नव्हता हे ट्रान्सक्रिप्टमध्ये दिसत आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

रोहित पवार म्हणाले की,दादांच्या अपघाताबाददल ज्या प्रकारे तपास झाला पाहिजे त्यावर आता वचक लागला आहे. दादांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र प्रयत्न करत आहे. मी व्हीएसआर, डीजीसीए विरोधात नाही, आमच्यात काही वैर नाही. जो अपघात झाला ते विमान व्हीएसआरचं होतं. डीजीसीएच्या अंतर्गत तपास सुरु आहे. अॅरो नावाचे कंपनी, कर्मचारी, मालक या सगळ्या गोष्टींमध्ये गेल्य़ाशिवाय खरं कळणार नाही. व्हीएसआर आणि अॅरो यांना मुद्दामून टार्गेट करत नाही. डीजीसीएमधील अधिकाऱ्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ताकदवान लोकांच्या मदतीने वाचवण्याचा प्रयत्न होत असेल तर तपास योग्य पद्धतीने होणार नाही. या सर्वांकडे क्रिमिनल आणि तांत्रिक दृष्टीने पाहावं लागणार आहे, असेही रोहित पवार यांनी बोलताना सांगितले आहे.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की,कागदपत्र रंगवली जाऊ शकतात जी रंगवली जात आहेत. तसेच, अपघात आणि पत्रकार परिषदेनंतर ही विमाने महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर काढली जात आहेत. हैदराबादला असलेले 'लेगसी 600' हे विमान आता सॅन मारिनो (युएसए) ला ट्रान्सफर करण्यात आले आहे. धंदा सुद्धा शिफ्ट करण्याचं काम तिथं सुरू झालं आहे. जर तुम्ही चोर नसालच घाबरता कशाला पण चोरच घाबरू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती,असे रोहित पवार यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

रोहित पवार म्हणाले की,अजितदादा जाऊन महिना झाला. अजितदादा यांच्या पक्षाने 15 दिवसांपूर्वी पत्र देऊन देखील, अद्याप सीबीआय चौकशी होतं नाही. श्वेता सिंग, मनीष कुमार जॉइंट डायरेक्टर यांचं घर व्हिके सिंग यांनी बांधून दिलं आहे. टीडीबी चे पुन्हा दुसरा संबंध निघाला आहे. आद्राचा उद्योग मंत्र्यांचे थेट संबंध आहे. संजय पाठक भाजपचा खासदार आहे. त्यांची इन्वेस्टमेंच आहे. दिलीप बिल्डकॉनने गॅरंटी दिली ती कुणाच्या सांगण्यावरून गॅरंटी दिली? तर मग ते कोण व्यक्ती आहेत जे यांना वाचवत आहे. ज्युबली हिल्समध्ये कोण राहते, ते तुम्हाला माहिती आहे. मार्केट पेक्षा 17 कोटी रूपये जास्त देऊन ही प्रॉपर्चटी खरेदी केली गेली. त्यांच्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी मागणी करून १२-१५ दिवस झाले तरी पुढे प्रकरण सीबीआयला देत नाही. मनन आणि समाफीटेल इन्व्हेस्टर आहे. ज्याला महाराष्ट्रातील एका मोठ्या पक्षाचे कार्यलय त्यांच्या नावे आहे. असेही रोहित पवार यांनी बोलताना सांगितले.

रोहित पवार म्हणाले की,व्हिके सिंगचा फोन आला होता. दीपक बोरकरला आम्ही फोन केला होता. आमच्या माणसाला व्हिके सिंगचा फोन आला. त्यांना वाटलं ते पत्रकार आहेत. एआयबीने मला क्लिअरन्स दिला आहे. अधिकची माहिती तुम्हाला कशाला हवी. खालपासून वरपर्यंत आमची ओळख आहे, असं व्हिके सिंग आमच्या लोकांना सांगत होता.कोणीच आमचं बिघडवू शकत नाही. असं व्हिके सिंग बोरकरला म्हणाले,आताही आमचे प्लेन उडत आहेत. सरकारही आमचे प्लेन वापरत आहे तर तुम्हाला अडचण काय? असा सवाल व्हीके सिंगने केला आहे. व्हीके सिंग हा व्हिएसआरचा मालक आहे. व्हॉट्सअप कॉल आला. तुमच्याकडे व्हॉट्सअप हॅकिंगची यंत्रणा असेल तर काढा. सहा महिने तो कुणाशी बोलत होता तेही काढा. महाराष्ट्र सदनमध्ये व्हिके सिंग कुणाला भेटला होता. तेही काढा. एवढा मोठा नेता गेल्यावर एवढी हिंमत येते कुठून?असे रोहित पवार यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

यावर सविस्तर बोलताना रोहित पवार म्हणाले की,आम्ही एफआयआर करा म्हणून सांगतो. पुरावे देऊन एआयबी चांगला तपास करेल वाटलं. पण कोणाची दखल घेत नाही. सुशांत सिंगच्या बाबतीत बिहार सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर दोन दिवसात सीबीआयने प्रकरण हाती घेतलं. अजितदादा जाऊन महिना झाला. त्यांच्या पक्षाने मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याला १४ दिवस होऊनही चौकशी केली जात नाही. याचा अर्थ काय?,तुमचा पैसा लेजिटिमेट आहे की हवाला मार्फत आणला याच्याशी आम्हाला घेणं नाही. फक्त चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे एवढंच म्हणायचं आहे. 90 लाख शेअर विस्ता कंपनीचे आहेत. विस्ता सेलमध्ये अम्बूजा आणि लंबोदरची गुंतवणूक आहे. महेंद्र कुमार गोयंका या कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत. या कंपनीत संजय पाठक नावाची व्यक्ती आहेत. ते भाजपचे मध्यप्रदेशचे आमदार आहेत. ते अतिशय श्रीमंत आहेत. या कंपन्यांमध्ये संजय पाठकचा मुलगा डायरेक्टर आहे. एका आमदाराने एक प्रायव्हेट विमान विकत घेतलं आहे. डीजीसीए या लोकांना वाचवत आहे.दादांची चौकशी राहिली बाजूला, संजय पाठकने जजलाही मॅनेज करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे डीजीसीएला मॅनेज करायला किती वेळ लागेल?,तुमचा पैसा लेजिटिमेट आहे की हवाला मार्फत आणला याच्याशी आम्हाला घेणं नाही. फक्त चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे एवढंच म्हणायचं आहे.असेही रोहित पवार यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले.


Most Popular News of this Week

Chembur Gymkhana Crowned Motiram Cup Champions

Chembur Gymkhana emerged the champion badminton club among men, winning the Elite Division of the Motiram Cup badminton tournament, organised by GMBA, promoted by Badminton Gurukul and hosted by...

बांद्रा गरीब नगरमध्ये मोठी...

मुंबईतील बांद्रा पूर्व परिसरातील गरीब नगर येथे सध्या सुरू असलेल्या...

अखिल भारतीय कामगार कर्मचारी...

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत...

Chembur Gymkhana Shines as Maharashtra’s Billiards Powerhouse

Chembur Gymkhana etched its name in glory by emerging victorious in the prestigious Nestlé–BSAM Billiards League 2026, a tournament organized under the Billiards & Snooker Association of...