१ एप्रिल २०२२ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत महानगरपालिकेने बुजवले ७ हजार २११ खड्डे

१ एप्रिल २०२२ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत महानगरपालिकेने बुजवले ७ हजार २११ खड्डे


गतवर्षीच्या याच कालावधीत होते १० हजार १९९ खड्डे, म्हणजेच खड्ड्यांच्या संख्येत यंदा घट


मुंबईतील इतर प्राधिकरणांनी देखील आपल्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे लवकर बुजवावेत म्हणून महानगरपालिकेकडून पाठपुरावा


मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर पावसाळ्यात होणाऱ्या खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी त्याचप्रमाणे रस्ते देखभाल करण्यासाठी  महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने पथक आणि कंत्राटदार नेमण्यासह विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. यंदा १ एप्रिल २०२२ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील रस्त्यांवर सुमारे ७ हजार २११ खड्डे बुजवले आहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे १२ हजार ६९५ चौरस मीटर इतके आहे. गतवर्षी याच कालावधीत महानगरपालिकेने सुमारे १० हजार १९९ खड्डे बुजवले होते, म्हणजेच यंदा खड्ड्यांच्या समस्येत घट झाली आहे.


दरम्यान, रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरित बुजविण्याचे काम महानगरपालिकेतर्फे केले जाते. खड्ड्यांबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी संकेतस्थळ, मोबाईल ॲप, समाज माध्यमं, टोल फ्री दूरध्वनी क्रमांक असे विविध पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.


मुंबईतील इतर शासकीय प्राधिकरणांनी देखील आपापल्या अखत्यारीतील रस्त्यांचे योग्य परीरक्षण करावे, खड्डे तातडीने बुजवावेत म्हणून देखील महानगरपालिका प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी दिली आहे. 


मुंबई महानगरात सुमारे २ हजार ०५५ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. पैकी १,२५५ किलोमीटर डांबरी तर ८०० किलोमीटरचे काँक्रिट रस्ते आहेत. डांबराच्या रस्त्या (अस्फाल्ट रोड) मध्ये असलेल्या बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे, ही नित्य प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेता, रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने दरवर्षी विविध उपाययोजना करण्यात येतात. यंदाही अशा उपाययोजना केल्या आहेत.


१. बृहन्मुंबई महानगरपालिकेने रस्त्यांवरील खड्डे शोधून ते भरण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथक तयार केले आहेत. या पथकाद्वारे खड्डे शोधून ते भरण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येते. खड्डे विषयक तक्रार प्राप्त झाल्यानंतर तो भरण्यासाठी ४८ तासांची मुदत असली तरी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाद्वारे २४ तासाच्या आतमध्ये खड्डे भरण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी ही पथकं समन्वय साधतात.


२. रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरीत बुजविण्याचे काम महानगरपालिका करत असते. त्यासाठी महानगरपालिकेच्या वरळी स्थित धूम्रजतू संयंत्र (अस्फाल्ट प्लांट) येथे निर्मित कोल्ड मिक्स महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांना त्यांनी नोंदवलेल्या मागणीप्रमाणे नियमितपणे पुरवण्यात येतो. आतापर्यंत २४ प्रशासकीय विभागांना मिळून सुमारे २ हजार ४२२ मेट्रिक टन ड्राय कोल्ड मिक्स पुरवण्यात आले आहे.


३. रस्त्यांवर खड्डे होवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच खड्डे बुजविण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा आमंत्रित करून महानगरपालिकेने कंत्राटदार नियुक्त केलेले आहेत. हे कंत्राट द्विवार्षिक स्वरुपाचे आहेत. संबंधित कंत्राटदारांकडून त्यांना नेमून दिलेल्या रस्त्यावरील खड्डे तातडीने भरले जातील, यासाठी देखील महानगरपालिकेने नेमलेली पथके लक्ष ठेवून आहेत.


४. प्रत्येक विभाग कार्यालयाकडून आपापल्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कारवाई केली जाते. त्यासाठी, दरवर्षी प्रमाणे २ कोटी रुपयांचा निधी यंदा देखील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने दीड कोटी रुपये हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तर उर्वरित ५० लाख रुपये हे खड्डे बुजविण्यासाठी दिले आहेत. 


५. याशिवाय, प्रकल्प रस्ते व दोष दायित्व कालावधीत (DLP) असलेले रस्ते हे संबंधित नियुक्त कंत्राटदाराकडून निविदेतील अटी व शर्तींनुसार मर्यादीत वेळेत तसेच विनामूल्य भरण्यात येतात. हे खड्डे भरण्यासाठी महानगरपालिकेतर्फे कोणताही मोबदला/अधिदान दिले जात नाहीत. कारण कंत्राट देतानाच त्यात परिरक्षण/देखभाल करण्याची अट समाविष्ट असते.


६. वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्त / छायाचित्रांद्वारे त्याचप्रमाणे समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) दर्शवलेले खड्डे देखील दखल घेवून तातडीने भरण्यात येतात.


७. रस्त्यांवरील खड्ड्यांविषयक तक्रार नोंदविण्यासाठी खालीलप्रमाणे पर्याय नागरिकांना उपलब्ध आहेत.


अ) ऑनलाइन पोर्टल/अ‍ॅप: 

MyBMCpotholefixit ॲप 


ब) आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक: 

1916


क) सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्र (CFC)


ड) सर्व २४ विभाग कार्यालयात लेखी तक्रारी देणे


इ) टोल फ्री दूरध्वनी क्रमांक: १८००२२१२९३


फ) ट्विटर: @mybmcroads


 ग) बीएमसी व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक: 91-8999-22-8999


ह) सर्व २४ प्रशासकीय विभागातील रस्ते अभियंत्यांचे समर्पित व्हॉट्सॲप क्रमांक. (यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहेत.)

 

ई) मुंबई महानगरात, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), रेल्वे, खासगी लेआउट याप्रमाणेच इतरही शासकीय प्राधिकरणांच्या अखत्यारित काही रस्ते आहेत. त्या - त्या रस्त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांची असते. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना नम्र विनंती आहे की, अश्या इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी संबंधित प्राधिकरणाकडे कृपया तक्रार नोंदवावी.

     

८) रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी/ खड्डे मुक्त रस्ते असावेत यासाठी, मुंबई महानगरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिवर्षी खड्ड्यांची संख्या आणि समस्या हळूहळू कमी होत आहे. मागील ५ वर्षात ६०८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत मुंबईतील सुमारे ८०० किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचे झाले आहेत. अशा रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली निघाल्या आहेत. यापुढे ६ मीटर रुंदीचे रस्तेसुद्धा टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महानगरपालिकेने स्वीकारले आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्डय़ांची समस्या निश्चितच कमी होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी दिली आहे.


Most Popular News of this Week

राहुल शेवाळे यांना प्रभू...

राहुल शेवाळे यांना प्रभू श्रीरामाचा आयोध्येतून खास आशीर्वादअयोध्येतील...

मुकेश अंबानी ने श्री...

मुकेश अंबानी ने श्री सिद्धिविनायक बाप्पा का लिया दर्शन●कपिलदेव...

दुर्गा माता मंदिर कुर्ला में...

दुर्गा माता मंदिर कुर्ला में नवरात्रि उत्सव सम्पन्न मुंबई: विगत 30 वर्षों...

भाजपा का संकल्प अगले 5 वर्षों...

भाजपा का संकल्प अगले 5 वर्षों तक मुफ्त राशन, गैस कनेक्‍शन और PM सूर्य घर से...

बीजेपी से निलंबित पूर्व...

बीजेपी से निलंबित पूर्व नगरसेविका ठाकरे गुट की शिवसेना में शामिलपनवेल।...

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ने...

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ने लगाए 'जय श्री राम' के नारेमुंबई: लगभग पांच सौ...