हैडलाइन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा

नववर्ष राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देवो;सामाजिक ऐक्यासह बंधुत्व अधिक दृढ होवो...


मुंबई,  - वसंत ऋतूच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा हा नवचैतन्य, नवनिर्मिती, नवउत्साह आणि नवसंकल्पांचा सण आहे. मराठी नववर्षाच्या या मंगलप्रसंगी जनतेच्या जीवनात भरभराट, आरोग्य, आनंद आणि समृद्धी नांदो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात,गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा एक महत्वपूर्ण सण आहे. घरोघरी गुढी उभारून आणि गावातून, शहरातून शोभायात्रांचे आयोजन करून मराठी माणूस हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. हे मराठी नववर्ष राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देवो, सामाजिक ऐक्य आणि बंधुत्व अधिक दृढ होवो. नव्या संकल्पांनी प्रेरित होऊन आपण सर्वजण महाराष्ट्राच्या विकासासाठी एकजुटीने योगदान देऊया. आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीच्या माध्यमातून महाराष्ट्र अधिक बळकट, समृध्द, संपन्न करूया, असे आवाहनही केले आहे.


Most Popular News of this Week

स्वामी समर्थांच्या प्रकट...

भांडुप पश्चिम येथील माता रमाबाई नगर आणि साई हिल परिसरात श्री स्वामी समर्थ...

मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या...

मुंबई शहर उपनगरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली असून पालिकेच्या...

मुंबई काँग्रेसचे एलपीजी गॅस...

अमेरिका इराण युद्धामुळे गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा मुंबईसह राज्यात जाणवू...

सोनखार-पामबीचमध्ये ‘संयुक्त...

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोनखार-पामबीच परिसरात हिंदू नववर्षाचे...

INDIAN NAVY CONTINUES IOS SAGAR INITIATIVE TO STRENGTHEN MARITIME PARTNERSHIP...

 Reaffirming India’s commitment to collaborative maritime security in the Indian Ocean Region, the second edition of Indian Ocean Ship (IOS) SAGAR commenced on 16 Mar 2026 .The Indian Navy...

मुख्य सचिवांनी घेतली...

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल  यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु...