अन्न व्यवसाय करणाऱ्या लघु व मध्यम उद्योजकांना (MSMEs) यापुढे FSSAI परवान्याचे नूतनीकरण करावे लागणार नाही — हे परवाने आता आजीवन वैध राहतील. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) सल्लागार डॉ. अलका राव यांनी मुंबईत झालेल्या CASMB च्या "प्रेरणा" महिला सक्षमीकरण शिखर परिषद व ६ व्या स्थापना दिन सोहळ्यात ही ऐतिहासिक घोषणा केली.
देशातील लघु व मध्यम उद्योजकांसाठी (MSMEs) एक ऐतिहासिक दिलासा देणारी घोषणा करताना भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) च्या सल्लागार डॉ. अलका राव यांनी जाहीर केले की, FSSAI चे परवाने व नोंदणी आता आजीवन वैध राहतील — म्हणजेच वारंवार नूतनीकरणाच्या जाचातून उद्योजकांची कायमची सुटका होणार आहे.
MSMEs वरील अनुपालन भार कमी करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या व्यापक नियामक सुधारणांचा हा भाग असून उलाढाल मर्यादेत बदल, दुहेरी अनुपालन रद्द आणि जोखीम-आधारित तपासणी पद्धतीचा यात समावेश आहे.
Food Safety and Standards Authority of India (FSSAI) ने Micro, Small and Medium Enterprises (MSMEs) वरील अनुपालन भार कमी करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण नियामक सुधारणा जाहीर केल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे FSSAI परवाने व नोंदणी आता आजीवन वैध राहणार असून, व्यावसायिकांची वारंवार नूतनीकरणाची दीर्घकालीन समस्या कायमची संपुष्टात आली आहे.
डॉ. अलका राव यांनी आपल्या प्रभावी भाषणामध्ये अन्नप्रक्रिया उद्योगात ती धोरणाबाबत स्पष्ट सखोल आणि दूरदृष्टी असलेले विवेचन केले. उपस्थितनव्या नियमांबाबत आश्वस्त व उत्साहित होऊन लघु-मध्यम उद्योजक घरी परतले.
लघु-मध्यम उद्योगांसाठी नियामक सुधारणा — एक नवा अध्याय
भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजित पुनहानी आणि अध्यक्षा पुण्यशीला श्रीवास्तव ज्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवही आहेत. यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हे प्राधिकरण व्यवसाय सुलभतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. याच धोरणाचा भाग म्हणून डॉ. राव यांनी पुढील प्रमुख सुधारणा जाहीर केल्या:
• FSSAI परवाने व नोंदणी आता आजीवन वैध — नूतनीकरणाची गरज संपुष्टात; देशभरातील अन्न व्यवसायांच्या दीर्घकालीन अनुपालन समस्येवर कायमचा तोडगा
• उलाढाल मर्यादेत सुधारणा — ₹१.५ कोटीपर्यंत नोंदणी; ₹५० कोटीपर्यंत राज्य परवाना; ₹५० कोटीहून अधिक उलाढालीसाठी केंद्रीय परवाना — व्यवसाय वाढीशी सुसंगत नियमन
• दुहेरी अनुपालन आवश्यकता रद्द — लहान व्यावसायिक तसेच पथारी व्यावसायिकांना विशेष लाभ; औपचारिकीकरण प्रक्रिया सुलभ
• जोखीम-आधारित तपासणी पद्धत — पारदर्शी, कार्यक्षम आणि विश्वासावर आधारित नियामक देखरेख
स्टार्टअप्स व MSMEs साठी विशेष उपाययोजना
नियामक पारदर्शिता बळकट करण्यासाठी आणि उद्योग सहभाग वाढवण्यासाठी FSSAI ने स्टार्टअप्स व MSMEs साठी अनेक लक्ष्यित उपाय सुरू केले आहेत:
• साप्ताहिक संवाद बैठका — Food Business Operators (FBOs), विशेषतः स्टार्टअप्स व लघु-मध्यम उद्योगांसाठी नियामक प्रश्नांचे त्वरित निराकरण व रियल-टाइम मार्गदर्शन
• साप्ताहिक अद्ययावत पारदर्शी मंजूर ट्रॅकर — निर्दिष्ट नसलेल्या खाद्य पदार्थांसाठी उत्पादन मंजुरीत सुस्पष्टता व जवाबदारी
• नियमित भागधारक सल्लामसलत — सहकारी संवादाला चालना; व्यवसाय सुलभतेत उल्लेखनीय सुधारणा
• पुनर्वापर केलेल्या PET (rPET) ला अन्न संपर्काची मंजुरी — प्लास्टिक पुनर्वापर व टिकाऊपणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योगाला पाठबळ
FSSAI National Codex Contact Point चा सन्मान
MSMEs मधील उद्योग सहभाग बळकट करण्यात व नियामक जागरूकता वाढवण्यातील सातत्यपूर्ण योगदानाबद्दल FSSAI च्या National Codex Contact Point (NCC) ला कार्यक्रमात CASMB National Award for Support to MSMEs प्रदान करण्यात आले.
MSME समुदायाकडून Dr. Rao यांचे कौतुक
Dr. Rao यांनी अधोरेखित केले की हे सर्व उपाय विश्वासावर आधारित प्रशासन, सुलभ अनुपालन आणि नियामक सहकार्याच्या दिशेने टाकलेले निर्णायक पाऊल आहेत — MSMEs ला वाढ, नवोन्मेष आणि सुरक्षित अन्न पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्याची संधी यामुळे मिळेल.
CASMB ने लघु उद्योजकांसाठी उभ्या केलेल्या सशक्त व सर्वसमावेशक व्यासपीठाचे आणि संस्थेच्या MSME समर्थन व क्षमता निर्माणातील सातत्यपूर्ण योगदानाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
उपस्थित उद्योग प्रतिनिधींनी त्यांच्या भाषणाचे उत्स्फूर्त स्वागत केले. MSME समुदाय FSSAI च्या विकसित व सहायक नियामक परिसंस्थेबद्दल आत्मविश्वासाने परतला.