हैडलाइन

हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (HMIS) प्रणालीचा डॉ. विपिन शर्मा यांनी स्वतः घेतला अनुभव

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी अंमलात आणलेल्या हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (HMIS) या प्रणालीच्या वापराचा प्रत्यक्ष रूग्ण म्हणून अनुभव अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला. मुलुंड येथील प्रसुतीगृह आणि पीजेेके महानगरपालिका दवाखाना येथे त्यांनी आज भेट दिली. या प्रणालीचा वापरातील विविध टप्पे, तांत्रिक बाबी, रूग्णांसाठीची उपयुक्तता आदी गोष्टींचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. तसेच प्रणालीच्या अंमलबजावणी आणि वापराबाबत समाधान व्यक्त केले. 

मुलुंड येथील प्रसुतीगृह आणि पीजेेके महानगरपालिका दवाखाना येथे एचएमआयएस प्रणालीच्या वापराबाबतचा नागरिकांचा अनुभव आणि अभिप्रायदेखील डॉ. विपिन शर्मा यांनी जाणून घेतला. त्याआधी दोन्ही ठिकाणी प्रणालीच्या अंमलबजावणीबाबतची माहिती डॉ. विपिन शर्मा यांना देण्यात आली. दवाखान्याच्या ठिकाणी स्वतःला ताप व घसा खवखवणे हा त्रास दोन दिवसापासून होत होता. त्यामुळे त्यांनी रूग्ण म्हणून उपचार ही घेतले आणि डॉ. विपिन शर्मा यांनी एचएमआयएस प्रणालीच नोंद करून घेतली. तसेच प्रणालीच्या माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचारासाठीचे औषधदेखील घेतली .


संपूर्ण यंत्रणेच्या वापर आणि अनुभव डॉ. विपिन शर्मा यांनी स्वतः घेतला. दवाखाना आणि प्रसूतीगृह याठिकाणी असलेल्या स्वच्छतेचेही डॉ. शर्मा यांनी कौतुक केले. संपूर्ण वैद्यकीय सुविधेच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या कामगिरी आणि कौशल्याची डॉ. शर्मा यांनी यावेळी आवर्जून प्रशंसा केली. नागरिकांच्या सेवेत घरोघरी फिरणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतही डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी संवाद साधला. 

एचएमआयएस प्रणालीच्या निमित्ताने तांत्रिक आव्हाने, अंमलबजावणी, औषधसाठा, मनुष्यबळ आदी बाबींचा आढावाही डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला. तसेच प्रत्येक टप्प्यातील बारकावेही जाणून घेतले. दीर्घकालीन उपाययोजना म्हणून या प्रणालीची अंमलबजावणी परिणामकारकपणे करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. 


आज डॉ. विपिन शर्मा यांनी मुरली देवरा महानगरपालिका नेत्र रूग्णालय येथील प्रस्तावित दुरूस्तीच्या कामाची पाहणी केली. रूग्णालय परिसरात सुरू असणाऱ्या कामाची आणि रूग्णालयातील व्यवस्थेची उपाय योजना माहिती त्यांनी जाणून घेतली. या रुग्णालयाच्या प्रस्तावित कामाशी संबंधित आढावा बैठक तातडीने घेण्याचेही निर्देश डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.   



Most Popular News of this Week

प्रियदर्शिनी पार्कमध्ये योग...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रोज दोन तास योगा करतात मी सुद्धा रोज अर्धा तास...

जय पवार यांची मान्सूनच्या...

महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि...

कोविडनंतर रोजगार गमावलेल्या...

मुंबई मध्ये गेली १३५ वर्ष डबेवाला कामगार वर्ग काम करतो आहे. परंतू कोव्हिड व...

मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड....

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना मुंबई बाहेर न जाता मुंबईत समायोजन करा,...

मुंद्रा से मुंबई-गोवा समेत 8...

अडानी मुंद्रा एयरपोर्ट ने स्टार एयर के साथ रणनीतिक साझेदारी करते हुए मुंबई...

महानगरपालिका आरोग्य...

महानगरपालिका रुग्णालयांमधील रुग्णसेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि...