हैडलाइन

चेंबूरमध्ये ११ फुटी रुद्राक्ष शिवलिंगाचे दर्शन; आशा मराठे यांनी घेतले दर्शन

चेंबूर येथील भुलिंगेश्वर देवालय ट्रस्टच्या प्रांगणात श्रावणानिमित्त सव्वा लाख रुद्राक्षांपासून साकारण्यात आलेल्या भव्य ११ फुटी रुद्राक्ष शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या शिवलिंगाच्या पूजेला नगरसेविका व प्रभाग समिती अध्यक्षा आशा मराठे यांनी भेट देत भगवान शिवांचे दर्शन घेतले.

१३ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या धार्मिक सोहळ्यात ११ सप्टेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आशा मराठे यांनी विधिवत पूजेत सहभागी होत उपस्थित शिवभक्तांशी संवाद साधला आणि सर्वांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.


अध्यात्म उपासिका मोहिनी गुप्ता यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यात ‘राईज ऑफ आदि महाशक्ती’ या अध्यात्मिक यूट्यूब चॅनेलचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ‘दक्षिणमुखी महाकाल रहस्य जो कोई नहीं जानता’ या पॉडकास्टचेही उद्घाटन करण्यात आले.

यावेळी ‘राष्ट्रमित्र’चा २१ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला असून, ‘राष्ट्रमित्र’ने २२व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी आशा मराठे यांनी मोहिनी गुप्ता यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, भव्य ११ फुटी रुद्राक्ष शिवलिंगाच्या दर्शनासाठी परिसरातील शिवभक्तांची मोठी गर्दी होत असून, भाविकांमध्ये या धार्मिक सोहळ्याबद्दल उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


Most Popular News of this Week

स्वतंत्रता दिवस पर सायन...

देश अपना 80वां स्वतंत्रता दिवस मना रहा है। इसी अवसर पर सायन कोलीवाड़ा...

गोवंडी के VK English High School में...

गोवंडी स्थित VK English High School में 80वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर ध्वजारोहण एवं...

कुर्ला परिसरातील दुर्घटनेत ६...

कुर्ला परिसरात घडलेल्या दुर्घटनेत एकूण १० जण बाधित झाल्याची माहिती समोर...

मुंबई पुलिस, CWC अधिकारियों और...

मुंबई में बाल श्रम से संबंधित मामले के चलते CWC की संरक्षण व्यवस्था में रह रहे...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत ‘मुंबई पब्लिक स्कूल, शिवाजी...

“तिरंगा यात्रा ५२ वर्षे ध्वज...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज...