हैडलाइन

भाजपचे मंत्री रमाकांत गुप्ता यांच्या पुढाकाराने दादर रेल्वे स्थानकावर स्वच्छता मोहिमेला यश

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान’ राबवण्यात आले. युवा जन मंच-9च्या वतीने आणि आयोजक रमाकांत गुप्ता यांच्या पुढाकाराने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वरून या स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांसह रेल्वे कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत श्रमदान केले. स्थानक परिसराची स्वच्छता करत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.


या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष नीरज उभारे, दीपनारायण शुक्ला, स्टेशन प्रबंधक डी. आर. तिवारी, रमाकांत शुक्ला, दादरच्या स्वास्थ्य निरीक्षक खुशबू परिमार यांच्यासह रेल्वे स्थानकातील स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छतेचा संदेश देत आयोजित करण्यात आलेली ही मोहीम उत्साहात पार पडली. ‘स्वच्छ रेल्वे – स्वच्छ भारत’ या संकल्पनेतून स्वच्छतेसाठी सामूहिक सहभागाचे आवाहन यावेळी करण्यात आले.



Most Popular News of this Week

बिग बॉस फेम डोनल बिष्ट की...

चेम्बूर जिमखाना ने क्रिकेट होम टूर्नामेंट 2026 की ऑफिशयल घोषणा कर दी है....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मुंबई के सायन कोळीवाडा में विधायक कैप्टन तमिल सेलवन आयोजित नवरात्री...

सारण आणि मिठी नदी...

बृहन्मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी बृहन्मुंबई...

नवी मुंबई महापालिका सभेत...

नवी मुंबई महानगरपालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत कायद्याचे राज्य,...

बोरिवली आरटीओ आणि मुंबई...

प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरिवली (MH-47) आणि मुंबई रायडर्स क्लब यांच्या...