हैडलाइन

एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 18 वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सिद्धार्थ मराठे याला दुहेरी मुकुट

एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 18 वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सिद्धार्थ मराठे याला दुहेरी मुकुट

  • एकेरीत मुलींच्या गटात आन्या जेकबला विजेतेपद

पुणे / ग्लोबलचक्र डेस्क: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 18वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत  मुलांच्या गटात सिद्धार्थ मराठे याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला तर, मुलींच्या गटात आन्या जेकब हिने आणि दुहेरीत देवांशी प्रभुदेसाई व सिया प्रसादे यांनी विजेतेपद संपादन केले.

एमएसएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे बालेवाडी या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या अंतिम फेरीत मुलांच्या गटात सिद्धार्थ मराठे याने चौथ्या मानांकित निशित रहाणेचा 2-6, 6-2, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. सिद्धार्थ हा एमएमसीसी महाविद्यालयात 12वी इयत्तेत शिकत आहे. मुलींच्या गटात अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित आन्या जेकब हिने श्रावणी देशमुखचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. आन्या ही लेक्सिकन इंटरनॅशनल शाळेत 12वी इयत्तेत कला शाखेत शिकत आहे. सिद्धार्थ आणि आन्या हे दोघेही पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. 

दुहेरीत मुलींच्या गटात अंतिम फेरीत देवांशी प्रभुदेसाईने सिया प्रसादेच्या साथीत वैष्णवी सिंग व श्रुती नानजकर यांचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात जय पवार व सिद्धार्थ मराठे यांनी सार्थ बनसोडे व अर्जुन अभ्यंकर यांचा 6-1, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक, 25एआयटीए गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण चार्टर्ड अकाऊटंट जितेंद्र अभ्यंकर, स्पर्धा संचालक संदीप नुलकर आणि एमएसएलटीए सुपरवायझर प्रणव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.

निकाल: मुली: अंतिम फेरी: आन्या जेकब[2] वि.वि.श्रावणी देशमुख 6-1, 6-1;

मुले: सिद्धार्थ मराठे वि.वि.निशित रहाणे[4] 2-6, 6-2, 6-3;

दुहेरी गट: मुले: जय पवार/सिद्धार्थ मराठे वि.वि.सार्थ बनसोडे/अर्जुन अभ्यंकर[2]6-1, 6-3;

मुली: देवांशी प्रभुदेसाई/सिया प्रसादे वि.वि.वैष्णवी सिंग/श्रुती नानजकर 6-2, 6-3.


Most Popular News of this Week

संजीव उपाध्याय यांची...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी मुंबई विभागीय...

मुसळधार पावसाच्या...

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई...

मुसळधार पावसामुळे निर्माण...

गेल्या दोन ते तीन दिवसा पासून मुसळधार पावसामुळे विभागात अनेक ठिकाणी झाडे...

चीनचा अरुणाचल प्रदेशातील...

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अरुणाचल...

'स्टार्टअप फ्रंटियर 1.0'मध्ये...

राज्यातील स्टार्टअप संस्कृतीला नवी दिशा देण्यासाठी आयोजित करण्यात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) के विधानसभा मुख्य सचेतक चेतन तुपे ने...