हैडलाइन

स्माईल कौन्सिलद्वारे प्रोत्साहित तीन नव उद्यमींची उपकरणे महानगरपालिकेच्या वापरासाठी आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्याकडे प्रातिनिधीक स्वरुपात सुपूर्द

नवउद्यमींद्वारे संशोधित अत्याधुनिक उपकरणांमुळे महानगरपालिका रुग्णालयातील वैद्यकीय सेवेचा दर्जा आणखी उंचावणारः महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल


स्माईल कौन्सिलद्वारे प्रोत्साहित तीन नव उद्यमींची उपकरणे महानगरपालिकेच्या वापरासाठी आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्याकडे प्रातिनिधीक स्वरुपात सुपूर्द

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रोत्साहित केलेल्या नव उद्यमींच्या पहिल्या तुकडीची नावीण्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये वापरासाठी आता उपलब्ध झाली असून स्माईल कौन्सिलच्या बैठकीत तीन नवउद्यमींची उपकरणे महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह यांच्याकडे प्रातिनिधीक स्वरुपात आज  सुपूर्द करण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ही उपकरणे वैद्यकीय सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी मदत करणार असून सोबतच या नव उद्यमींना देखील त्यातून पाठबळ मिळेल, असा विश्वास महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह यांनी याप्रसंगी व्यक्त केला.


आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन तसेच नाविण्यपूर्ण संशोधन करुन सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त अशा वस्तू, उपकरणे आणि तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणणाऱया नव उद्योजकांना (Start-ups) प्रोत्साहन देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने "सोसायटीफॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू आंत्रप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल" बिझनेस इनक्युबेशन सेंटर ही सुविधा सुरू केली आहे. या केंद्राच्या माध्यमातून नव उद्योजकांनी संशोधित केलेल्या वस्तू, उपकरणे, तंत्रज्ञानाचा अवलंब महानगरपालिकेच्या विभागांमध्ये करणे, त्यातून नागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे आणि त्यासोबतच या नव उद्योजकांना भरारी घेण्यासाठी सहाय्य करणे, हा स्माईल उपक्रमाचा हेतू आहे. 


या संकल्पनेनुसार तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोत्साहन देण्यात आलेली ५ नव उद्यमींची पहिली तुकडी ऑगस्ट २०२१ मध्ये सुरु करण्यात आली होती. या तुकडीने संशोधित केलेली उत्पादने व तंत्रज्ञान आता बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रायोगिक तत्वावर वापरण्यास उपलब्ध झाली आहेत.


स्माईल कौन्सिलच्या संचालक मंडळाची बैठक महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त सभागृहात आज (दिनांक ११ जुलै २०२२) पार पडली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल हे होते. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, सहआयुक्त (दक्षता) श्री. अजीत कुंभार, उपआयुक्त (सुधार) श्री. केशव उबाळे, प्रमुख - व्यवसाय विकास श्रीमती शशी बाला व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.


नव उद्योजकांच्या पहिल्या तुकडीतील तीन उद्योजकांनी आपली नवसंशोधित अत्याधुनिक उपकरणे महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांना या बैठकीप्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात सुपूर्द केली. यामध्ये हेस्टॅक ऍनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिर्वण चॅटर्जी तसेच सहसंस्थापक श्री. गौरव श्रीवास्तव, अयाती  डिव्हासेस प्रायव्हेट लिमिटेडचे व्यावसायिक विभाग प्रमुख श्री. पंकज इंचुलकर, आयू डिव्हायसेस प्रायव्हेट लिमिटेडचे श्री. विशेष सिन्हा यांनी आपापली नवसंशोधित उपकरणे महानगरपालिकेकडे सुपूर्द केली.


ही संशोधित अत्याधुनिक उपकरणे, त्यांचा महानगरपालिकेत उपयोग याविषयीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.


१) हेस्टॅक ऍनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड: सदर स्टार्ट-अप संसर्गजन्य रोगांसाठी विषाणुंच्या गुणसुत्रीय क्रमनिर्धारण (जीनोम सिक्वेंसिंग) विश्लेषणावर काम करत आहे. हा स्टार्ट अप महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे, यामुळे आरोग्य सेवांचे निर्णय अधिक चोखपणे घेता येतील.


२) अयाती  डिव्हायसेस प्रायव्हेट लिमिटेड: या स्टार्टअपने एक नवीन न्यूरोथेरपी स्क्रीनर उपकरण विकसित केले आहे, जे 'मधुमेहपूर्व' टप्प्यात मधुमेहाच्या रुग्णांची लवकर तपासणी करण्यात मदत करते. जेणेकरून, मधुमेही रुग्णांच्या संदर्भात पाय विच्छेदनाची परिस्थिती टाळता येईल. या नावीण्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या २ उपकरणांचा महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये प्रायोगिक तत्त्वावर उपयोग सुरु करण्यात आला आहे. यामुळे संभाव्य मधुमेही रुग्णांसाठी जलद  व प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना करण्यास आरोग्य विभागाला मदत होणार आहे.


३) आयू डिव्हासेस प्रायव्हेट लिमिटेड: आयु डिव्हासेस यांनी 'ब्लूटूथ सक्षम स्टेथोस्कोप' हे नावीन्यपूर्ण उपकरण तयार केले आहे. महानगरपालिकेच्या वैद्यकीय मंडळींना रूग्णांचे निरीक्षण करण्यासाठी शरीराच्या इच्छित अवयवांवर स्टेथोस्कोप ठेवण्यास आणि संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत सुरक्षित अंतर राखण्यास या आधुनिक उपकरणाची मदत होणार आहे. कारण, ब्ल्यूटूथ हेडफोनद्वारे डॉक्टरांना निरीक्षण ऐकण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे सदर उपकरण स्वयंचलितपणे प्रत्येक रुग्णाची माहिती मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे नोंदवते आणि संग्रहीत करते. परिणामी, हस्तलिखित नोंदींची गरज दूर होऊन वेळेची देखील बचत होते. या तंत्रज्ञानाची ७५ उपकरणे महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापरासाठी उपलब्ध झाली आहेत.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्यवसाय विकास विभागाच्या माध्यमातून स्माईल कौन्सिल उपक्रम राबवला जात असून येत्या काळात या प्रकारचे आणखी काही प्रकल्प महानगरपालिकेच्या विविध खात्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याकरिता कार्यवाही सुरु आहे. या उपक्रमामुळे नवउद्यमींच्या नावीण्यपूर्ण तंत्रज्ञानास, उत्पादनांना अधिक वाव मिळेल. तसेच तरूण उद्योजकांना मुंबई महानगरामध्ये अधिकाधिक प्रोत्साहन मिळेल, असा महानगरपालिका प्रशासनाला विश्वास आहे.


Most Popular News of this Week

सोशिल मीडिया पर अंजान महिला...

सोशिल मीडिया पर अंजान महिला से बात करना पड़ा महंगा, 1 करोड़ 22 लाख की ठगीपनवेल।...

मुकेश अंबानी ने श्री...

मुकेश अंबानी ने श्री सिद्धिविनायक बाप्पा का लिया दर्शन●कपिलदेव...

नवी मुंबई में धूमधाम से किया...

नवी मुंबई में धूमधाम से किया गया नए वर्ष का स्वागत,जगह जगह निकाली गई...

भाजपा का संकल्प अगले 5 वर्षों...

भाजपा का संकल्प अगले 5 वर्षों तक मुफ्त राशन, गैस कनेक्‍शन और PM सूर्य घर से...

पनवेल इलाके में मानसून पूर्व...

पनवेल इलाके में मानसून पूर्व नालों की सफाई शुरू,आयुक्त डॉ.प्रशांत रसाल ने...

पेट केयर सेंटर में कुत्तों की...

पेट केयर सेंटर में कुत्तों की पिटाई, मामला दर्जनवी मुंबई। मानवता शर्मसार...