पत्रकार जीवन तांबे यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान

पत्रकार जीवन तांबे यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान 



मुंबई। जेष्ठ पत्रकार जीवन तांबे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.राज्याचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित संभारभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.पत्रकार जीवन तांबे गेल्या 25 वर्षांपासून विद्यार्थी संघटना,सामाजिक श्रेत्रात कार्यरत आहेत.विद्यार्थ्यांच्या समस्या,विद्यार्थ्यांच्या वसती गृहाच्या समस्यांवर आंदोलन उभारली. तांबे 15 वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात काम कार्यरत असून आपल्या लेखणीच्या  माध्यमातुन अनेक समस्यांवर आवाजाला वाचा फोडली.शिक्षण, आरोग्य,अंधश्रद्धा निर्मूलन, झोपडपट्टीतील समस्या तसेच झोपडपट्टी तोडल्यानंतर बेघर झालेल्याबेघर झालेल्या जीवणासाथीचा संघर्ष असे विविध विषय त्यांनी बातमीदाराच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचा प्रयन्त केला आहे. त्याच्या या कार्याची शासनाने दखल घेऊन तांबे यांना महाराष्ट्र  डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.


Most Popular News of this Week

सुरेशचंद्र राजहंस यांची...

सुरेशचंद्र राजहंस यांची मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी...