पर्यावरण संवर्धनासाठी दुर्गंधीतून सौंदर्यीकरणाकडे,एक पाऊल पुढे
मुंबई महानगरपालिका जी. उत्तर विभागातील संशाईन टॉवर च्या मागे एल्फिन्स्टन नवीन ब्रीज च्या खाली नो मॅन लॅन्ड वर गेल्या कित्येक महिन्यांपासून साठलेला आणि कुजलेला कचरा व त्यापासून निर्माण झालेली दुर्गंधी नष्ट करण्यासाठी संगम प्रतिष्ठानच्या पर्यावरण प्रेमी स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन, सुमारे 5 मेट्रिक टन कचरा सातत्याने 6 दिवस कचऱ्यात उतरून संपूर्ण कचरा साफसफाई करून घेतल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये आदराचे आणि आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
संगम प्रतिष्ठानचे मार्गदर्शक माजी मनपा अधिकारी तानाजी घाग यांनी सन साईन टॉवर च्या पुढाकाराबद्दल,स्थानिक रहिवाश्यांच्या सहकार्याबद्दल तसेच जी.उत्तर विभाग घन कचरा व्यवस्थापन खात्याचेही आभार मानले.परंतु ही वस्तू रेल्वे आणि मनपाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे बऱ्याचदा प्रशासनाकडून उत्तर मिळाल्याने संगम प्रतिष्ठान ने पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि मुंबईकरांना त्यांच्याच बेजबाबदारपणामुळे होणारे आरोग्याचे नुकसान पहाता. एक पाऊल पुढे टाकले आहे.
परंतु हा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ व सुंदर व्हावा यासाठी प्रशासन आणि स्थानिकांचे सहकार्य घेण्याचे आणि त्याचा पाठपुरावा करण्याचेही श्री. तानाजी घाग पर्यावरण मित्र यांनी कबुल केले आहे.
या 6 दिवसात प्रचंड दुर्गंधीला परिसरातील स्वराज्य सोसायटी, खापरी देवी झोपडपट्टी तसेच सन साईन टॉवर सह नागरिकांना सामोरे जावे लागले. स्वच्छ भारत अभियानात याची दखल घेतली जावी अशी घाग यांनी विनंती केली आहे.