हैडलाइन

सुरेशचंद्र राजहंस यांची मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती.

सुरेशचंद्र राजहंस यांची मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती.


मुंबई, मुबई विभागीय काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी सुरेशचंद्र राजहंस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले देऊन नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

सुरेशचंद्र राजहंस यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षात प्रवक्ते, मुंबई काँग्रेसच्या स्लम सेल विभागाचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते यासारख्या महत्वाच्या पदावर काम केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक अशी दुहेरी भूमिका बजावली. २०२२ साली सकाळ समूहाच्या वतीने सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे तर २०२३ रोजी प्रेस, पत्रकार संघाच्या वतीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. लोकनेते एकनाथराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले राजहंस हे मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांचे कट्टर समर्थक मानले जातात. 

“मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी देवून माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याबद्दल मी सर्व मान्यवर नेत्यांचे आभार मानतो. पक्षाची बाजू अधिक ताकतीने मांडण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्यावर टाकलेल्या विश्वास सार्थ करण्याचा कसोशीने प्रयत्न करेन”, असे राजहंस म्हणाले.


Most Popular News of this Week

मंगलवार को जिले के स्कूल और...

*रत्नागिरी, 18 (जिमका)- मौसम विभाग द्वारा दी गई अग्रिम सूचना के अनुसार, कल 19...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने...

*मीठी नदी का निरीक्षण किया, नदी किनारे के इलाकों में व्यवस्थाएँ...

महाराष्ट्र सरकार, बृहन्मुंबई...

_दिनांक 19 अगस्त 2025_*महाराष्ट्र सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पुलिस...

कांग्रेस प्रदेश अध्यक्ष...

बुलढाणा/मुंबई, 18 अगस्त 2025महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष...

मुंबई स्थित टाटा मेमोरियल...

• सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक एस्टेट लिमिटेड, कोल्हापुर को...

बारिश और डिजिटल युग ने मुंबई...

????  सायन में, पेट्रोल पंप और बस डिपो के पास, एस.के. मोरे न्यूज़पेपर एजेंसी है,...