हैडलाइन

अंधेरी, विलेपार्ले येथील घनकचरा व्यवस्थापन चौकी, कीटकनाशक चौकी व परिरक्षण चौकी यांना भेट देऊन भिडे यांनी केली पाहणी

महानगरपालिकेच्या परिरक्षण चौक्यांमध्ये (Maintenance Chowkies) आवश्यक व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असतानाही, संबंधित अभियंत्यांकडून अपेक्षित दर्जाचे प्रभावी पर्यवेक्षण होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर, २६ प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी (Assistant Commissioner) संबंधित परिरक्षण चौक्यांतील मनुष्यबळाचा सखोल आढावा घ्यावा. दगडी कडा (Curb Stone) दुरुस्ती, रस्ता दुभाजक दुरुस्ती, पदपथ दुरुस्ती यासारखी नियमित व लहान-मोठी देखभाल दुरूस्‍तीची कामे महानगरपालिकेच्या अंतर्गत मनुष्यबळामार्फतच करावीत. दैनंदिन देखभाल-दुरुस्ती कामासाठी कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करून महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कामगारांचा अधिक परिणामकारक व कार्यक्षम वापर करावा, असे स्‍पष्‍ट निर्देश महानगरपालिका आयुक्‍त अश्विनी भिडे यांनी दिले. मुंबई महानगरातील रस्ते देखभाल व दुरुस्ती कामांमध्ये नागरिकांना दृश्य स्वरूपात आणि सकारात्मक बदल जाणवेल, अशा पद्धतीने परिरक्षण विभागातील सहायक अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांनी नियोजनबद्ध व उत्तरदायित्वपूर्ण कामकाज करावे, असे निर्देशदेखील भिडे यांनी दिले आहेत.

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील घनकचरा व्यवस्थापन चौकी, विलेपार्ले (पश्चिम) टाटा कंपाऊंड येथील कीटकनाशक चौकी, विलेपार्ले (पश्चिम) बजाज मार्ग येथील परिरक्षण चौकी यांना भेट देऊन पाहणी केली. चौकीवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांसमवेत संवाद साधत भिडे यांनी कामगारांच्‍या कामकाजाचे स्वरूप, कामकाज वेळ आणि अडीअडचणी जाणून घेतल्या. स्वच्छता चौक्यांसह परिरक्षण व कीटकनाशक विभागांच्या चौक्या सुस्थितीत व मूलभूत सेवायुक्‍त कराव्यात, अशी सूचना भिडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.


यावेळी भिडे यांनी कीटकनाशक नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध उपकरणांची पाहणी करत त्यांच्या कार्यपद्धतीची प्रात्यक्षिकासह माहिती कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली. मूषक नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, चौकीवरील एकंदरीत कामकाज आदींबाबत सविस्‍तर माहिती घेत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंदवही आणि अन्य बाबींची पडताळणी केली. कर्मचारी गैरहजेरीचे प्रमाण कमी व्‍हावे, यासाठी प्रयत्‍न करावेत, असेदेखील त्‍यांनी नमूद केले.

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे म्‍हणाल्‍या की, कीटकनाशक नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करावेत. खाद्यान्नाच्या कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना कराव्यात. डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी जनजागृती करावी. के पश्चिम विभागात विशेषतः नेहरु नगर या परिसरात मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. कीटकनाशक विभागाने या भागावर अधिक लक्ष केंद्रीत करुन कीटकनाशक उपाययोजना कराव्यात. डास उत्पत्तीस्थाने नष्ट करावीत, असे निर्देश भिडे यांनी दिले.

महानगरपालिकेच्या परिरक्षण विभागातील सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांनी कर्ब स्टोन बसविणे, पदपथ दुरुस्ती, रस्ते दुभाजक दुरुस्ती आदी नियमित लहान-मोठी देखभाल कामे शक्य तितकी महानगरपालिकेच्या अंतर्गत मनुष्यबळामार्फत (In-house Labour) करून घ्यावीत. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कामगारांचा अधिक प्रभावी, कार्यक्षम व नियोजनबद्ध वापर करावा. प्रशासकीय विभागाच्या सहायक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील परिरक्षण चौक्यांना नियमित भेटी देऊन उपलब्ध मनुष्यबळ, प्रलंबित कामे आणि स्थानिक गरजा यांचा सविस्तर आढावा घ्यावा. त्यानुसार क्षेत्रनिहाय कृती आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने कामांची प्रभावी अंमलबजावणी करावी, जेणेकरून नागरिकांना प्रत्यक्ष आणि गुणवत्तापूर्ण बदल अनुभवता येईल, असेही निर्देश भिडे यांनी दिले.  

या पाहणी दौ-यानंतर भिडे यांनी इर्ला नाला, एसएनडीटी नाला आणि गझधरबांध उदंचन केंद्र यांना प्रत्यक्ष भेट देऊन पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वीच उदंचन केंद्रातील यंत्रणा सुसज्ज ठेवावी. पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणी उपसा संच कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी. जुहू येथील इर्ला पर्जन्‍यजल उदंचन केंद्र हे पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावे, जेणेकरून मीलन भुयारी मार्ग, कूपर रुग्णालय परिसर, विलेपार्ले रेल्वे स्थानक तसेच जुहू-विलेपार्ले विकास क्षेत्रातील नागरिकांना पूरस्थिती पासून दिलासा मिळेल. तसेच, जुहू समुद्रकिनाऱ्याकडे वाहून जाणारा घनकचरा व तरंगता कचरा रोखण्यासाठी यांत्रिक जाळी प्रणाली म्‍हणजेच बॅक / फ्रंट बार स्‍क्रीन चा प्रभावी वापर करावा, असे स्पष्ट निर्देश भिडे यांनी दिले.

उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (परिमंडळ ७) मनीष वळंजू, सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


Most Popular News of this Week

बांद्रा गरीब नगरमध्ये मोठी...

मुंबईतील बांद्रा पूर्व परिसरातील गरीब नगर येथे सध्या सुरू असलेल्या...

Chembur Gymkhana Shines as Maharashtra’s Billiards Powerhouse

Chembur Gymkhana etched its name in glory by emerging victorious in the prestigious Nestlé–BSAM Billiards League 2026, a tournament organized under the Billiards & Snooker Association of...

शिवाजी पार्क येथे रंगणार...

मुंबईकर क्रिकेटप्रेमींना आता पारंपरिक क्रिकेटसोबतच वेगवान, आक्रमक आणि...

मुंबई महापौर चषक इनडोअर...

मुंबई : दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन...

शिवाजी पार्क येथे रंगणार...

मुंबईकर क्रिकेटप्रेमींना आता पारंपरिक क्रिकेटसोबतच वेगवान, आक्रमक आणि...

MSEDCL व पोलीस प्रशासन बैठकीत...

नवी मुंबईच्या वाशी-सानपाडा येथील प्रभाग क्र. १८ मधील वाशीगाव, सेक्टर ३१, ३१...