हैडलाइन

महापौर रितू तावडे यांच्यासह विविध मान्यवरांनी केली पाहणी

मुंबईच्या महापौर रितू तावडे, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, समाजवादी पक्ष गटनेता व स्थानिक नगरसेविका अमरिन अब्राहनी, सुधार समितीच्या अध्यक्ष संध्या दोशी, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिश भांदिर्गे, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष मीनल तुर्डे, नगरसेवक श्री. रोहिदास लोखंडे, नगरसेवक अजय पाटील, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) तथा नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांच्यासह विविध मान्यवर, संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत या नवीन संकुलाची व विभागांची पाहणी करुन सेवा कार्यान्वित करण्यात आली.

        

दरम्यान, नायर रुग्णालयातील सदर अपघात व आपत्कालीन वैद्यकीय सेवा संकुलाचे समारंभपूर्वक लोकार्पण करण्याचे नियोजित होते. तथापि, कतार देशाचे 'पिता अमीर', माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचे १२ जुलै २०२६ रोजी निधन झाले. त्यामुळे केंद्र शासनाने भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असल्याने नायर रुग्णालयातील सदर लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला. यावेळी शेख हमद बिन खलिफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तथापि, वैद्यकीय सेवा सुरु करण्याची प्राथमिकता व आवश्यकता पाहता, मान्यवरांची या नवीन संकुलाची पाहणी केली व त्यानंतर सेवा कार्यान्वित करण्यात आली. *नायर रुग्णालयातील अपघात व आपत्कालीन वैद्यकीय सेवा (Casualty – EMS) संकुल विषयक माहिती -* राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अर्थात नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) यांच्याद्वारे विहित किमान मानक आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी नायर रुग्णालयात अत्याधुनिक अपघात व आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. नायर रुग्णालय विस्तार अंतर्गत हाती घेतलेल्या 'प्राईम प्रोजेक्ट्स डेव्हलपमेंट' मधील हा एक प्रमुख आणि महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या विस्तार योजनेत आगामी ऑन्कोलॉजी (कॅन्सर) इमारत, निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) निवासस्थाने आणि एल आकाराच्या (L-Shaped) इमारतीचाही समावेश आहे.

        

२४ तास अखंडित कार्यरत राहणारा अपघात विभाग आणि प्रगत आपत्कालीन वैद्यकीय सेवा यांचे हे एकत्रीकरण रुग्णांना जलद व उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार देण्यास सक्षम आहे. इमारतीचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आणि सर्व वैधानिक ना-हरकत प्रमाणपत्रे (NOCs) प्राप्त झाल्यानंतर दिनांक २५ जून २०२६ रोजी हे संकुल नायर रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. या नवीन संकुलामुळे रुग्णालयाच्या पुढील टप्प्यातील विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता जुनी अपघात विभाग इमारत निष्कासित (Demolition) करून त्या ठिकाणी २० मजली आधुनिक निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) निवासस्थानांचे बांधकाम केले जाणार आहे. रुग्ण सुरक्षा आणि वैद्यकीय कार्यक्षमता सर्वोच्च राखण्यासाठी, संपूर्णपणे वातानुकूलित (Centrally Air-conditioned) असलेल्या या विभागाचे कामकाज दोन स्वतंत्र टप्प्यांत सुरू केले जाणार आहे. या प्राथमिक टप्प्यात अपघात विभाग, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, ट्रायज वॉर्ड (Triage Ward), बालरोग (Paediatrics), अस्थिव्यंगोपचार (Orthopaedics), शस्त्रक्रिया (Surgery) आणि मायनर ऑपरेशन थिएटर (Minor OT) यांसारख्या मुख्य क्लिनिकल सेवा तत्काळ सुरू करण्यात आल्या आहेत. प्रगत आपत्कालीन निदान व चाचणी सेवा (Emergency Diagnostic Services) यापुढील काळात लवकरच सुरू केल्या जातील. रुग्णांची तपासणी जलदगतीने व्हावी, तातडीचे उपचार वेळेत मिळावेत आणि प्रशासकीय कामे विनाअडथळा पार पडावीत, या उद्देशाने या विभागाची रचना दोन मजल्यांवर अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली आहे. तळ मजला (Ground Floor)- त्वरित तपासणी, उपचार आणि प्राथमिक निदान यादृष्टिने हा मजला रुग्णांची तातडीने तपासणी करून त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. प्रशासकीय आणि ट्रायज केंद्र - रुग्णांची नोंदणी आणि प्राथमिक तपासणी सुलभ व्हावी म्हणून येथे स्वतंत्र 'योजना नोंदणी कार्यालय' आहे. तसेच, कायदेशीर व वैद्यकीय (Medico-legal) बाबी हाताळण्यासाठी 'कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर (CMO) कक्ष' आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे कक्ष - येथे सामान्य औषधशास्त्र (General Medicine), सामान्य शस्त्रक्रिया (General Surgery), बालरोग (Paediatrics) आणि अस्थिव्यंगोपचार (Orthopaedics) तज्ज्ञांसाठी स्वतंत्र रूम्स आणि एक 'सामान्य तपासणी कक्ष' (Examination Room) आहे. तातडीचे उपचार - तातडीच्या छोट्या शस्त्रक्रियांसाठी सर्व सोयींनी युक्त 'मायनर ऑपरेशन थिएटर' (Minor OT) उपलब्ध आहे.

        

'प्रारंभीचे महत्त्वाचे तास' (Golden Hour) व्यवस्थापन - अणीबाणीच्या प्रसंगात पहिल्या महत्त्वाच्या तासात रुग्णावर अतिदक्षता उपचार करण्यासाठी सर्व सुविधांनी सज्ज असलेला '८ रुग्णशय्यांचा आपत्कालीन वैद्यकीय सेवा (EMS) वॉर्ड' तयार करण्यात आला आहे. निदान आणि सुरक्षा - तत्काळ एक्स-रे काढण्यासाठी 'एक्स-रे रूम' आणि विषारी किंवा घातक घटकांचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या सुरक्षित स्वच्छतेसाठी 'पेशंट डीकंटॅमिनेशन रूम' आहे. सहाय्यक सुविधा - कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम व प्रसाधनगृहे आहेत. तसेच, रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत झालेल्या (ब्रॉट डेड) व्यक्तींच्या कायदेशीर औपचारिकता पूर्ण होईपर्यंत, मृतदेह सन्मानाने ठेवण्यासाठी स्वतंत्र 'शवगृह क्षेत्र' (Mortuary Area) आहे. पहिला मजला (First Floor) -* हा मजला प्रदीर्घ काळ रुग्णांच्या देखरेखीसाठी, आपत्ती व्यवस्थापनासाठी आणि वैद्यकीय कर्मचाऱयांच्या निवासासाठी राखीव आहे.

         

मोठी आपत्ती आणि ट्रायज वॉर्ड - अचानक मोठी दुर्घटना घडल्यास किंवा अणीबाणीच्या प्रसंगी अनेक रुग्णांना एकाच वेळी सामावून घेण्यासाठी २१ रुग्णशय्यांचा मोठा निरीक्षण विभाग (ऑब्झर्व्हेशन वॉर्ड) तयार करण्यात आला आहे. क्लिनिकल सपोर्ट - प्रयोगशाळांमधील चाचण्यांसाठी झटपट रक्ताचे नमुने घेणारी 'ब्लड कलेक्शन रूम' आणि एक अतिरिक्त 'सल्लागार कक्ष' येथे आहे. आपत्कालिन सज्जता केंद्र (Disaster Store) - मोठ्या दुर्घटना हाताळण्यासाठी आवश्यक असणारी औषधे, साधनसामग्री आणि वैद्यकीय साहित्याचा राखीव साठा करण्यासाठी विशेष 'आपत्कालिन सज्जता केंद्र' बनवण्यात आले आहे.


Most Popular News of this Week

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) के विधानसभा मुख्य सचेतक चेतन तुपे ने...

BLO म्हणजे कोण? घराघरातील...

सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये Special Intensive Revision (SIR) मोहीम सुरू...

'स्टार्टअप फ्रंटियर 1.0'मध्ये...

राज्यातील स्टार्टअप संस्कृतीला नवी दिशा देण्यासाठी आयोजित करण्यात...

भक्ति, संगीत और उत्साह से सजी...

मुंबई के Alberione Hall, St. Paul's College & Media Complex, Bandra West में वरिष्ठ नागरिकों के लिए "Bhajan Jamming Evening" का...

ALL INDIA NAU SAINIK CAMP 2026 CONCLUDES AT INS SHIVAJI, LONAVALA

The National Cadet Corps’ flagship annual training camp for Naval Wing cadets, All India Nau Sainik Camp (AINSC) 2026, concluded at INS Shivaji, Lonavala. Organized by NCC Directorate Maharashtra...

महापौर रितू तावडे यांच्यासह...

मुंबईच्या महापौर रितू तावडे, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, समाजवादी...