'पादचारी प्रथम’अभियानाच्या काटेकोर अंमलबजावणीचे महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने पादचाऱ्यांना सुरक्षित, सुकर आणि अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमार्फत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आलेल्या २०० पदपथांपैकी १३४ पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. या कारवाईत १९७ किलोमीटर अंतर इतके पदपथ अडथळामुक्त करण्यात आले आहेत. तसेच या अभियान अंतर्गत भांडुप रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरातील पदपथांवर गत दोन दिवसांत ९४ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली आहे.  

माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महानगरपालिका आयुक्त 0 अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बृहन्मुंबईमध्ये पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमण तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून पादचारी प्रथम हे अभियान राबविण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त  अश्विनी भिडे यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना 'पादचारी प्रथम' या अभियानाच्या काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. यासोबतच आयुक्त  अश्विनी भिडे यांच्याकडून या अभियानाबाबत प्रत्येक प्रशासकीय विभागाचा (वॉर्ड ऑफीस) आणि त्या विभागातील विविध खात्यांकडून सुरू असलेल्या कारवाईचाही आढावा घेण्यात येत आहे. मुंबईतील व्यावसायिक आणि नागरिकांनीही या अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मुंबईतील पदपथ पादचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पादचारी प्रथम’अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार, भांडुप रेल्वे स्थानकासारख्या मोठ्या प्रमाणात पादचारी वर्दळ असलेल्या परिसरातील पदपथ अडथळामुक्त करण्यावर भर देण्यात आला. भांडुप परिसरात पहिल्या टप्प्यात १४ पदपथांवरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. या १४ पदपथांपैकी जवळपास ११ पदपथांवरील अतिक्रमण काढण्यात सुरुवात करण्यात आली आहे. 

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (परिमंडळ ६) श्री. संतोषकुमार धोंडे, सहायक आयुक्त (एस विभाग) समरीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. 

या कारवाईमुळे भांडुप रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या तसेच स्थानकाकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी पदपथावरील मार्ग मोकळा झाला आहे. गर्दीच्या वेळेत होणारी वाहतूक व पादचारी कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच भांडुप रेल्वे स्थानक परिसरातून लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दिशेने नागरिकांना आता अडथळामुक्त पदपथ मिळणार आहे. या कारवाईसाठी ५ जेसीबी, १० डंपर, ५० हून अधिक अधिकारी-कर्मचारी, १०० कामगार तसेच ७० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. ‘एस’ विभागाकडून ‘पादचारी प्रथम’ अभियानासोबतच मोठ्या प्रमाणात कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन करण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. 

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, पदपथ हे पादचाऱ्यांच्या सुरक्षित आणि सुलभ मार्गक्रमणासाठी आहेत. पदपथांवर अनधिकृतपणे दुकाने, स्टॉल्स, बांधकामे अथवा कोणतेही साहित्य ठेवून अडथळा निर्माण करू नये. पादचारी प्रथम या अभियानांतर्गत पदपथ अडथळामुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.

या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २०० पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. त्यापैकी १३४ पदपथांचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे १९७ किलोमीटर अंतर इतके पदपथ अडथळामुक्त करण्यात आले असून, १४५९ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या सर्व २६ विभागात हे अभियान हाती घेण्यात आले आहे.



Most Popular News of this Week

छात्रों की गुंज’...

मुलींच्या शिक्षणासाठी देशातील सर्वात पहिली शाळा ज्या पुण्यात...

मुंबई प्रेस क्लबमध्ये...

महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज मुंबई...

“आता वेळकाढूपणा खपवून घेणार...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर...

“आता वेळकाढूपणा खपवून घेणार...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर...

मुंबई में भव्य कांवड़ यात्रा,...

मुंबई के वडाला ईस्ट स्थित हनुमान मंदिर में आयोजित भव्य कांवड़ यात्रा में...

धूमधाम से मनाया गया समाजसेवक...

मुंबई चेंबूर के सुमन नगर और नवजीवन सोसाइटी स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक...