हैडलाइन

अंधेरीतील चित्रकूट मैदान परिसरात पालिकेची धडक कारवाई; ३४ हजार चौ.फुटांचे बांधकाम निष्कासित

अंधेरी परिसरातील चित्रकूट मैदानस्थित डीआरएम मोटर्स, डीआरएम अपारेल्स आणि  चित्रकूट बँक्वेट हॉल यांच्या सुमारे ३४ हजार चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाकडून निष्कासन करण्यात आले.

उपायुक्त (परिमंडळ-४)  भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

अनधिकृत बांधकाम प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चित्रकूट मैदानस्थित डीआरएम मोटर्स, डीआरएम अपारेल्स आणि चित्रकूट बँक्वेट हॉल यांच्याशी संबंधित शाह कन्स्ट्रक्शन कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती. तथापि, त्यांनी या नोटीसीला माननीय उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. माननीय उच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळली. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाने निष्कासनाची कारवाई हाती घेतली. या अंतर्गत, डीआरएम मोटर्स, डीआरएम अपारेल्स आणि चित्रकूट बँक्वेट हॉल यांच्या सुमारे ३४ हजार चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामाचे आज निष्कासन करण्यात आले.

‘के पश्चिम’ प्रशासकीय विभाग अंतर्गत कार्यरत इमारत व कारखाना विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी विविध संयंत्रांच्या सहाय्याने ही कारवाई केली. आंबोली पोलीस ठाण्याकडून यावेळी पुरेसा बंदोबस्त तैनात होता.
 


Most Popular News of this Week

सहकारी साखर कारखान्यांसाठी...

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी...

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५...

माजी खासदार समीर भुजबळ...

एसआयआर मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान पात्र असूनही ज्या नागरिकांची नावे...

लोकनेते आदरणीय गणेश नाईक...

मंडळाच्या भूमिकेनुसार शिरवणे गावातील स्थानिक गोविंदा पथकांच्या द्वारेच...

पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या...

नवी मुंबईतील सानपाडा येथे साईभक्त सेवा मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव...

गोविंदांचा थरार, कलाकारांचा...

नवी मुंबईतील ऐरोली परिसरात शिवसेना प्रणित सुनील चोगुले स्पोर्ट्स...