हैडलाइन

‘सुगंधी शहर अभियान’ अंतर्गत ‘अंगण दत्तक योजना २०२६’चा उत्साहात शुभारंभ

नवी मुंबईत ‘सुगंधी शहर अभियान’ अंतर्गत ‘अंगण दत्तक योजना २०२६’चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला.

या उपक्रमांतर्गत नागरिकांनी आपल्या परिसरातील सार्वजनिक जागेची स्वच्छता, सौंदर्य, सुरक्षितता आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारायची आहे. या कार्यक्रमाला तब्बल १२०० नागरिकांची उपस्थिती, तर ३०० अंगण दत्तक पालकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.


यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई स्वच्छतेत देशात नंबर एक करण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच या उपक्रमाला भविष्यात देशासह जागतिक स्तरावर अभिनव मॉडेल म्हणून ओळख मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात सात अंगण दत्तक पालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच नागरिकांना सार्वजनिक जागा दत्तक घेता याव्यात यासाठी ‘sugandhishahar.org’ या वेब पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले.


Most Popular News of this Week

गणेशोत्सवाच्या...

श्रीगणेशोत्सवाच्या काळात मुंबईत नियमित प्रवाशांसोबतच भाविक आणि...

भक्तीमय वातावरणात मुंबईच्या...

भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ईशान्य...

राष्ट्रवादी काँग्रेस...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या...

मोठ्या संख्येने महिला...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती...

Paradise Group के MD मनीष बठीजा ने टीम के...

Paradise Group के Managing Director मनीष बठीजा का जन्मदिन खास अंदाज में मनाया गया। इस मौके पर...

SIR च्या माध्यमातून ३ कोटी २८...

भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळून,...