हैडलाइन

भक्तीमय वातावरणात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घेतले खा. संजय दिना पाटील यांच्या गणरायांचे दर्शन

भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडुप पश्चिम येथील निवासस्थानी आगमन करून गणरायांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील व त्यांची ज्येष्ठ कन्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी महापौर रितू तावडे यांचे आत्मीयतेने स्वागत केले. याप्रसंगी नगरसेविका जागृती पाटील यांचीही उपस्थिती होती.

खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानी गणरायांचे आगमन झाल्यापासून भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून बाप्पांच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली जात आहे. याच भक्तीमय परंपरेत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काल रात्री पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी गणरायाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी आशीर्वाद घेतला. खासदार संजय दिना पाटील आणि नगरसेविका राजोल पाटील यांनी महापौरांचे मनःपूर्वक स्वागत केले. या भक्तिपूर्ण भेटीमुळे निवासस्थानी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


Most Popular News of this Week

प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक...

उद्योजक आणि समाजसेवक किशोर मन्याल यांच्या राहत्या घरी विराजमान झालेल्या...

घाटकोपरमध्ये मोदींचा...

घाटकोपर (पूर्व) मधील श्री वडलेश्वर महादेव मंदिर येथे आदरणीय प्रधानमंत्री...

विधायक कैप्टन आर. तमिल सेल्वन...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के अवसर पर सायन-कोलीवाड़ा के विधायक...

खारदेवनगर घाटला...

छत्रपती शिवाजी महाराज सेवा मंडळ आयोजित अखिल खारदेवनगर घाटला सार्वजनिक...

शेतकरी अस्मानी व सुलतानी...

मागील ४०-४५ दिवसापासून पावसाने खंड दिला असून पीकं करपून गेली आहेत. दुष्काळ...

श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी...

महाराष्ट्राचा राज्य महोत्सव असलेला श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने...