हैडलाइन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडेंची घाटकोपर मेट्रो स्थानकाला पाहणी भेट

श्रीगणेशोत्सवाच्या काळात मुंबईत नियमित प्रवाशांसोबतच भाविक आणि पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घाटकोपर मेट्रो स्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. 

सण आणि उत्सव काळात मुंबईकरांचा आणि मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांचा प्रवास सुकर, सुरक्षित व गतिमान व्हावा या उद्देशाने महापौरांनी मेट्रो स्थानकावरील संपूर्ण सुविधा आणि व्यवस्थेची बारकाईने पाहणी केली आणि प्रवाशांशी थेट संवाद साधला.

या पाहणी दौऱ्यादरम्यान महापौर रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने घाटकोपर मेट्रो स्थानक परिसरात पुरवल्या जाणाऱ्या विविध नागरी सेवा-सुविधा, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. 


यासोबतच, मेट्रो प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या दैनंदिन सुविधा आणि एकूणच मेट्रो प्रवासाच्या अनुभवाविषयी महापौरांनी प्रवाशांशी आस्थेने चर्चा केली. प्रवाशांनी मांडलेली मते, सूचना आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर, नागरिकांच्या प्रवासाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी प्रशासनाने तत्काळ सकारात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना महापौरांनी दिल्या.

त्याचप्रमाणे, महापौरांनी मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विविध तांत्रिक व व्यवस्थापकीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने श्रीगणेशोत्सवादरम्यान आणि एरवी गर्दीच्या (पीक अवर्स) वेळेत केले जाणारे गर्दी नियंत्रण, मेट्रोचे संचालन आणि नियोजन, दैनंदिन प्रवासी संख्या, तिकिटांचे सध्याचे दर, तसेच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी भविष्यात मेट्रो कोचेसची संख्या वाढविण्याची योजना याबाबत महापौरांनी मेट्रो प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली. मेट्रोच्या महसूल उत्पन्नाचे विविध मार्ग आणि त्यामध्ये शाश्वत वाढ करण्यासाठी मेट्रो प्रशासनाने केलेले नियोजन या विषयांवरही महापौरांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.


मेट्रो प्रशासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन यांच्यामध्ये अधिक समन्वय साधण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य पुरवले जाईल, असे महापौरांनी यावेळी मेट्रो प्रशासनाला आश्वस्त केले.

या पाहणीप्रसंगी मेट्रोचे व्यवसाय प्रमुख अजय कुमार, उपमहाव्यवस्थापक मयंक रावत, वरिष्ठ व्यवस्थापक अल्पेश नागदा यांच्यासह मेट्रोचे संबंधित तांत्रिक व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एन' विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र हांगे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



Most Popular News of this Week

पचास साल से गणेशोत्सव मना रहे...

चेंबूर कैंप के चर्चित समाजसेवक रमेश लोहाना पिछले 50 वर्षों से श्रद्धा और...

प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक...

उद्योजक आणि समाजसेवक किशोर मन्याल यांच्या राहत्या घरी विराजमान झालेल्या...

बीजेपी नेता अमित शेलार के घर...

गणेशोत्सव के मौके पर बीजेपी नेता अमित शेलार के घर गणपति बाप्पा की भव्य...

बीजेपी नेता अमित शेलार के घर...

गणेशोत्सव के मौके पर बीजेपी नेता अमित शेलार के घर गणपति बाप्पा की भव्य...

बीजेपी नेता अमित शेलार के घर...

गणेशोत्सव के मौके पर बीजेपी नेता अमित शेलार के घर गणपति बाप्पा की भव्य...

घाटकोपरमध्ये मोदींचा...

घाटकोपर (पूर्व) मधील श्री वडलेश्वर महादेव मंदिर येथे आदरणीय प्रधानमंत्री...