हैडलाइन

नवी मुंबई-रायगडमधील पुनर्विकासासाठी ‘EODR 2.0’चे आयोजन

नवी मुंबईतील पुनर्विकासाच्या विविध विषयांवर मार्गदर्शन आणि माहिती देण्यासाठी ताज विवांता हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली.

यामध्ये नवी मुंबई आणि रायगड परिसरातील पुनर्विकास प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने CREDAI MCHI YOUTH NMRच्या वतीने ‘Ease of Doing Redevelopment – EODR 2.0’ या एकदिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हे प्रदर्शन रविवार, 27 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत नवी मुंबईतील CIDCO एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे. या प्रदर्शनाला गृहनिर्माण संस्था, सोसायटी प्रतिनिधी आणि मालमत्ता मालकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रदर्शनात 40 हून अधिक विकासक सहभागी होणार असून, नवी मुंबई आणि रायगड परिसरातील 1,500 हून अधिक गृहनिर्माण संस्था भेट देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

पुनर्विकासाबाबत सोसायट्यांना योग्य आणि आवश्यक माहिती मिळावी, उपलब्ध पर्याय समजून घेता यावेत तसेच विकासकांशी थेट संवाद साधता यावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

याशिवाय पुनर्विकास प्रक्रियेशी संबंधित विविध विषयांवर पॅनेल चर्चा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे सोसायटी प्रतिनिधींना त्यांच्या प्रश्नांवर तज्ज्ञांशी थेट चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.

यावेळी CREDAI MCHI YOUTH NMRचे अध्यक्ष सुमित अहलुवालिया यांनी पुनर्विकासाबाबत जनजागृती आणि पारदर्शक संवादाची गरज व्यक्त केली. दरवर्षी अधिकाधिक सोसायट्या पुनर्विकासासाठी पात्र होत असल्याने सोसायट्या आणि विकासकांमधील संवाद सातत्याने सुरू राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील वर्षी सुमारे 800 ते 1,000 गृहनिर्माण संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. यंदा विकासक आणि गृहनिर्माण संस्थांचा सहभाग वाढवत EODR 2.0च्या माध्यमातून पुनर्विकासासंदर्भात माहिती, मार्गदर्शन आणि संवादासाठी अधिक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


Most Popular News of this Week

पचास साल से गणेशोत्सव मना रहे...

चेंबूर कैंप के चर्चित समाजसेवक रमेश लोहाना पिछले 50 वर्षों से श्रद्धा और...

मंत्री आशिष शेलार यांनी...

उद्योगपती आणि समाजसेवक, सिंधी समाजाचे नेते किशोर मन्याल यांच्या खार येथील...

CHIEF OF THE NAVAL STAFF VISIT TO NEW ZEALAND

Adm Krishna Swaminathan, CNS, visit to New Zealand, aimed at further strengthening maritime cooperation and enhancing professional and operational linkages between the Indian Navy and the Royal New...

‘सुगंधी शहर अभियान’ अंतर्गत...

नवी मुंबईत ‘सुगंधी शहर अभियान’ अंतर्गत ‘अंगण दत्तक योजना २०२६’चा उत्साहात...

करण अदानी और प्रणव अदानी ने...

मुंबई के प्रसिद्ध चिंचपोकली के चिंतामणि गणपति मंडल में अदाणी परिवार ने...

उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी...

आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि आजचा पहिला दिवस... सगळीकडे...