हैडलाइन

पादचारी प्रथम (Pedestrian First)’ अभियानांतर्गत विलेपार्ले पूर्व येथील महात्मा गांधी मार्गावरील ६५० मीटर लांबीचा पदपथ अडथळामुक्त

पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी आवश्यक मार्ग मोकळा करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने, के दक्षिण विभागातील विलेपार्ले पूर्व येथील महात्मा गांधी मार्ग हा अधिक पादचारी वर्दळ असलेल्या पाच प्राधान्यक्रमाच्या मार्गांपैकी एक म्हणून निवडण्यात आला आहे. या मार्गावरील सुमारे ६५० मीटर लांबीचा पदपथ आज (दिनांक १८ नोव्हेंबर २०२६) अडथळामुक्त करून पादचाऱ्यांसाठी पूर्ववत करण्यात आला आहे.


’पादचारी प्रथम (Pedestrian First)’ अभियानासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना आणि हे अभियान मुंबईत मोठ्या स्वरूपात प्रभावी पध्दतीने राबविण्यात येत आहे. या अभियानाला नागरिकांचा मोठा सहभाग लाभत आहे. या अभियानाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. 


या अनुषंगाने, विलेपार्ले पूर्व परिसरातील महात्मा गांधी मार्गावर शाळा, जैन मंदिर, बिझनेस पार्क, चित्रपटगृह आणि महानगरपालिका उद्यान यांसारखी महत्त्वाची ठिकाणे असून, पूर्व-पश्चिम जोडणीच्या दृष्टीनेही हा मार्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळे या परिसरात पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या अनुषंगाने आज (दिनांक १८ नोव्हेंबर २०२६) ‘के दक्षिण’ विभागाच्या सहायक अभियंता (परिरक्षण) विभागामार्फत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पदपथावरील ८ बांधकामे निष्कासित करण्यात आली, तर ६ परवानाधारक स्टॉल्स हटविण्यात आले. या कारवाईमुळे सुमारे ६५० मीटर लांबीचा पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळा झाला आहे.


उप आयुक्त (परिमंडळ ३) विश्वास मोटे, के दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त वनिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या पाच प्राधान्यक्रमाच्या मार्गांपैकी महात्मा गांधी मार्गावरील पदपथ अडथळामुक्त करण्याची ही महत्त्वपूर्ण कार्यवाही असून, यामुळे परिसरातील पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि ये-जा अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.


Most Popular News of this Week

गुर्जरगौड़ ब्राह्मण समाज का...

मुंबई। गुर्जरगौड़ ब्राह्मण हितैषिणी सभा (रजि.), मुंबई द्वारा आयोजित दिवाली...

आमदार दिलीप लांडे...

 शिवसेना आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या...

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड....

 सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक...

भगवान बिरसा मुंडा यांचा...

पुणे दि. १५ नोव्हेंबर -जल... जमीन आणि जंगलाशी नातं जोडून जगणाऱ्या आदिवासी...

क्रांतिकारक बिरसा मुंडा...

क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका...

लातूर जिल्हा बँकेत सहकार...

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी...