राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी तसेच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या स्थानिक प्रश्नांसह विविध प्रशासकीय बाबी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी प्रत्येकाची समस्या Mhnun घेत संबंधित विषयांची माहिती घेतली.
नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने आवश्यक कार्यवाही व्हावी आणि संबंधितांना वेळेत दिलासा मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकारी व प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.
जनतेच्या अडचणी थेट जाणून घेऊन त्यावर प्रशासकीय पातळीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वपूर्ण ठरला.