घाटकोपर (पूर्व) मधील श्री वडलेश्वर महादेव मंदिर येथे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दीपप्रज्वलन व महाआरतीच्या माध्यमातून भक्तिभावाने आजचा विशेष दिवस साजरा करण्यात आला.
देवाधिदेव महादेवाच्या चरणी नतमस्तक होत आदरणीय मोदीजींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेच्या कार्यासाठी निरंतर ऊर्जा लाभावी तसेच देशाच्या प्रगतीचा प्रवास अधिक गतिमान व्हावा, राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत विकासाची ही वाटचाल अविरत सुरू राहावी, यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
या भक्तिमय सोहळ्यास घाटकोपर पूर्वचे सेवाभावी आमदार परागभाई शाह, नगरसेवक धर्मेश गिरी, जिल्हा उपाध्यक्ष विकास कामत, मंडळ अध्यक्ष विशाल पूंज, महामंत्री बाबू दरेकर, पीयूष दास, विद्युत काजी, देवेन्द्र रत्नम, कुणाल रत्नम, नीलम गोलेचा यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.