हैडलाइन

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘दिलास तू मातीला आकार’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि समाजसुधारक स्वर्गीय वि. ना. पुरव यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘दिलास तू मातीला आकार’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. बाल विकास संघ सभागृह, गांधी मैदान, चेंबूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

लेखक देवेंद्र पाठारे यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव यांच्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील कार्याचा परिचय करून देण्यात आला आहे.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. यास्मिन लुकमानी उपस्थित होत्या. तर डॉ. दिलीप बलसेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी भाजपच्या नगरसेविका आणि जिल्हाध्यक्ष आशा मराठे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. तसेच लोकमान्य टिळक लायब्ररी, चेंबूरच्या व्यवस्थापन मंडळातील पदाधिकारी, साहित्यप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘दिलास तू मातीला आकार’ या पुस्तकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव यांच्या कार्याची आणि विचारांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.


Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

भाजपचे मंत्री रमाकांत गुप्ता...

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान’...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...