मुंबई, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या८०व्या वाढदिवसानिमित्त कुर्ला विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.दोन तासात ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार मिलिंद कांबळे यांनी स्वतः रक्तदान करून केली. रक्तदान हे श्रेष्ठदान असून यामुळे कोणाचा जीव वाचवण्यासाठी आपण उपयोगी पडतो, असे मिलिंद कांबळे यांनी सांगितले.या कार्यक्रमाला जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद गायकवाड, बिलकीस शेख,पामेला दत्ता,फारीदा खान,आसिफ हकीम,सत्यनारायण पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन मुन्ना गुंडाकली,आप्पा शिर्के,संजय लोंढे,अभिजित कांबळे,दिनेश काथुरे यांनी केले.स्थानिक नागरीक व पक्ष कार्यत्यांनी या कार्यक्रमात चांगली उपस्थिती लावली.