हैडलाइन

खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा 2022: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र संघाला शुभेच्छा

खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा 2022


खेलो इंडिया स्पर्धेत विजयी भवः

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र संघाला शुभेच्छा


●ग्लोबल चक्र डेस्क 

मुंबई: हरियाना येथे होत असलेल्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विजयी भवः म्हणत अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. याही स्पर्धेत प्रथम क्रमांक घेऊन या, असा शुभसंदेशही त्यांनी महाराष्ट्राच्या खेळाडू व प्रशिक्षकांना दिला.

हरियाना येथे चौथी खेलो इंडिया स्पर्धा ४ जूनपासून होत आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे संघ कालपासून टप्प्याटप्प्याने स्पर्धेसाठी विमानाने रवाना होत आहेत. महाराष्ट्राने खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होऊ नये म्हणून ही सुविधा दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात (बालेवाडी, पुणे) महाराष्ट्राच्या खेळाडूंचे सराव शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. तसेच बक्षिसाच्या रकमेतही भरगोस वाढ केली. सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूस ३ लाख, रौप्य पदकासाठी २ लाख तर कांस्य पदक पटकावणाऱ्या खेळाडूस १ लाख रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. क्रीडा राज्य मंत्री आदिती तटकरे यांनीही स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शुभेच्छा देत खेळाडूंचा हुरूप वाढवला आहे.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील खेळाडूंनी लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. पहिल्या स्पर्धेत दुसऱ्या होता. परंतु मागील दोन स्पर्धांत महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावला. याही वर्षी तोच कित्ता गिरवला जाईल. युवा शक्तीला संधी देण्यासाठी, त्यांच्या क्रीडा कौशल्याचा अधिकाधिक विकास होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. २०१८पासून राष्ट्रीय स्तरावर खेलो इंडिया स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.

या वर्षी महाराष्ट्राचे ३७१ खेळाडूंचा संघ सहभागी होत आहे. त्यात १९३ मुली तर १७८ मुलांचा समावेश आहे. ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात दिशादर्शन केले आहे. खेळातही तीच पताका कायम राहील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

----------

अधिकारी आहेत लक्ष ठेवून

क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे हे स्पर्धेचे नोडल ऑफिसर आहेत. क्रीडा अधिकारी अरूण पाटील हे मुख्य व्यवस्थापक आहेत. हे सर्व व इतर अधिकारी स्पर्धेवर जातीने लक्ष ठेवून आहेत.



 स्पर्धेपूर्वी कबड्डी संघाचा कसून सराव

स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या कबड्डी संघाने कसून सराव केला. यजमान हरियाना संघाने महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचा धसका घेतला आहे. गीता कांबळे-साखरे, ज्ञानेश्वर खुरांगे, महेश खर्डेकर, अनिल सातव, किशोर बोंडे, पाडवी यांनी स्पर्धेसाठी गेम प्लान तयार केला आहे. त्यानुसार स्पर्धेत कामगिरी करण्यासाठी खेळाडू सज्ज झाले आहेत. मुलांच्या संघांची लढत उद्या (शुक्रवारी) ४ वाजता आंध्र प्रदेशसोबत सामना होणार आहे. ५ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता महाराष्ट्रविरूद्ध पंजाब आणि ६ जून रोजी उत्तर सोबत लढत होईल. हा सामना सकाळी १० वाजता होईल.



Most Popular News of this Week

श्री स्वामी समर्थ महाराज...

श्री स्वामी समर्थ महाराज जयंतीनिमित्त, स्वामीनाथ मठात प्रकट दिन साजरा...

स्पेस स्पोर्ट्स क्लबचा 6...

स्पेस स्पोर्ट्स क्लबचा 6 विकेट राखून विजय- डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

सायन कोकरी आगार की...

सायन कोकरी आगार की झोपड़पट्टियों का विकास अडानी से किए जाने की मांग मुंबई:...

अर्जुन चोपड़ा के घर पुत्र के...

मुंबई : भारत के प्रसिद्ध दैनिक समाचार पत्र "पंजाब केसरी" के प्रबंधक एवं भाजपा...

प्लास्टिक सप्लाई एंव उपयोग...

प्लास्टिक सप्लाई एंव उपयोग करनेवालो पर मनपा की नजर,2 सप्ताह में 450 किलो...

वक्फ विधेयकाला विरोध करुन...

वक्फ विधेयकाला विरोध करुन उबाठा मुस्लिम मतांसाठी लाचारी...