हैडलाइन

सीसीआय- जीएमबीए बॅडमिंटन: तारिनी सुरीला दुहेरी मुकुट

सीसीआयजीएमबीए बॅडमिंटन:



तारिनी सुरीला दुहेरी मुकुट



मुंबई(प्रतिनिधी):
फॉर्मात असलेल्या अव्वल मानांकित तारिनी सुरी हिने अपेक्षेप्रमाणे सीसीसीआय-जीएमबीए बॅडमिंटन स्पर्धेत 17 आणि 19 वर्षांखालील मुली एकेरी गटाचे जेतेपद पटकावले.
सीसीआय बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या स्पर्धेच्या 17 वर्षांखालील मुली गटात टॉप सीडेड तारिनीने दुसर्या मानांकित रिया विन्हेरकर याच्यावर 21-16, 21-18 असा सरळ गेममध्ये विजय मिळवलाया फायनलनंतर 45 मिनिटांच्या फरकाने झालेल्या 19 वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत तारिनीने दुसर्या सीडेड सानवी मर्डोलकर एकतर्फी लढतीत 21-12, 21-14 अशी मात केली.
तारिनी हिने सहकारी अनन्या शाह हिच्यासह मुलींच्या 19 वर्षांखालील दुहेरी तसेच आर्यवर्धन जाधवसह मिश्र दुहेरी जेतेपदावरही कब्जा केला आहे.


निकाल: 17 वर्षांखालील मुली एकेरी  (अंतिम फेरी): 1-तारिनी सुरी विजयी वि. 2-रिया विन्हेरकर 21-16, 21-18.
19 
वर्षांखालील मुली एकेरी  (अंतिम फेरी): 1-तारिनी सुरी विजयी वि. 2-सानवी मर्डोलकर 21-12, 21-14.


Most Popular News of this Week