मुंबई अग्निशमन दलाच्या सात जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक, तर चार जवानांना अग्निशमन सेवा पदक प्रदान

मुंबई अग्निशमन दलाच्या सात जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक, तर चार जवानांना अग्निशमन सेवा पदक प्रदान


ग्लोबल चक्र न्यूज डेस्क 

मुंबई: अग्निशमन दलाच्या सात जवानांना जाहीर झालेले राष्ट्रपती शौर्य पदक, तर चार जणांना जाहीर झालेले अग्निशमन सेवा पदक केंद्रीय गृहराज्‍यमंत्री श्री. नित्‍यानंद राय यांच्‍या हस्‍ते नागपूरमधील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविदयालयात आज (दि. १७ एप्रिल २०२३) समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. 


केंद्रीय गृहमंत्रालयाच्‍या अग्निशमन सेवा, नागरी सुरक्षा व गृहरक्षक महासंचालनालयाचे महासंचालक श्री. ताज हसन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा राष्ट्रपती पदक प्रदान सोहळा पार पडला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात ऑगस्ट २०२१ मध्ये झालेल्या वायू गळती वेळी प्रसंगावधान राखून नागरी संरक्षणाची उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई अग्निशमन दलाच्‍या सात जवानांना शौर्य पदक तर चार जवानांना विशिष्‍ट आणि गुणवत्‍तापूर्ण सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक प्रदान करण्‍यात आले आहे. 


बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, सहआयुक्त (सुधार) श्री. रमेश पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी राष्ट्रपती शौर्य पदक व अग्निशमन सेवा पदक प्राप्‍त अग्निशमन अधिकारी व जवानांचे अभिनंदन केले आहे. 


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी  दहा मेट्रिक टन क्षमतेच्या द्रवरुप इंधन वायू (एलपीजी) च्या साठवण टाकीतून गळती सुरु झाली होती. वायूच्या टाकीजवळ रुग्णालयातील कक्षात विविध रुग्ण उपचार घेत होते. तसेच जवळच्या इमारतीत कोविड संसर्ग बाधित रुग्णही दाखल होते. अचानक वायूगळती झाल्यामुळे रुग्णालयात घबराटीचे वातावरण पसरले.  वायूगळतीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मोठ्या कौशल्याने संपूर्ण परिस्थिती हाताळली होती.  वायूगळतीवर नियंत्रण मिळवतानाच दुसरीकडे अत्यंत कमी कालावधीत ५८ रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सामग्रीसह सुरक्षित ठिकाणी हलविले, तसेच कर्मचाऱ्यांना रुग्णालयातून सुखरूप बाहेर काढले. एवढेच नव्हे तर आजुबाजूच्या इमारती, चाळ यामधील रहिवाशी, दुकाने देखील सुरक्षितरित्या रिकामी करुन नागरिकांचे स्थलांतर केले. ही संपूर्ण परिस्थिती हाताळताना प्रसंगावधान, संयम, वेगवेगळ्या यंत्रणांशी समन्वय, शिस्तबद्ध कामकाज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून अग्निशमन दलाच्या नागरिकांनी कस्तुरबा रुग्णालयातील रुग्ण, कर्मचारी यांच्यासह आजुबाजूच्या परिसरातील शेकडो नागरिकांचा जीव वाचवण्यास प्राधान्य दिले. वेगवेगळ्या तांत्रिक आव्हानांवर मात करुन वायूगळती रोखून कोणतीही दुर्घटना घडू दिली नाही, आगीची संभाव्य घटना देखील टाळण्यात यश मिळवले. ही सर्व कामगिरी साहसी स्वरुपाची असल्याने या जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक व अग्निशमन सेवा पदक नुकतेच जाहीर करण्यात आले होते. या पदकांचे आज समारंभपूर्वक वितरण करण्‍यात आले.  



राष्ट्रपती शौर्य पदक व अग्निशमन सेवा पदक विजेत्‍यां मध्ये विभागीय अग्निशमन अधिकारी श्री. किशोर ज्ञानदेव घाडीगावकर, वरिष्ठ केंद्र अधिकारी श्री. विशाल चंद्रकांत विश्वासराव, केंद्र अधिकारी श्री. दीपक मधुकर जाधव, केंद्र अधिकारी श्री. सागर जगन्नाथ खोपडे, प्रमुख अग्निशामक श्री. संजय सदाशिव गायकवाड, अग्निशामक श्री. संजय लक्ष्मण निकम,  अग्निशामक श्री. गणेश देवराम चौधरी या सात जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहे. 


त्याचबरोबर विभागीय अग्निशमन अधिकारी श्री.  संपत बापूराव कराडे, प्रमुख अग्निशामक श्री. दत्तात्रय बंडू पाटील, यंत्रचालक श्री. संदीप रामचंद्र गवळी, सहाय्यक कार्यदेशक श्री. गुरुप्रसाद अनिल सावंत यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे अग्निशमन सेवा पदक बहाल करण्‍यात आले आहे.



दरम्यान, दिनांक १६ जुलै २०२० रोजी सायंकाळी ४.४३ वाजता दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात मिंट रोड येथील भानुशाली इमारत या सहा मजली निवासी व वाणिज्य वापरातील जुन्या इमारतीचा दक्षिण पूर्वेकडील भाग कोसळल्यानंतर इमारतीचा उर्वरित भाग अत्यंत धोकादायक अवस्थेत होता. त्यामुळे ढिगा-याखाली अडकलेले १५ रहिवासी व इमारतीच्या अन्य भागात अडकलेले १२ रहिवासी यांची सुखरुप सुटका करण्यात आली. याबद्दल मुंबई अग्निशमन दलाचे राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त सेवानिवृत्त उपआयुक्त (आपत्कालिन व्यवस्थापन) श्री. प्रभात रहांगदळे, सेवानिवृत्त प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. हेमंत परब, विभागीय अग्निशमन अधिकारी श्री. आत्माराम मिश्रा, विभागीय अग्निशमन अधिकारी श्री. कृष्णात यादव यांनाही या समारंभात सन्मानित करण्यात आले. भानुशाली इमारत बचाव कार्यातील साहसाबद्दल केंद्र अधिकारी श्री. अनिल पवार, अग्निशामक श्री. बाळासाहेब राठोड यांना देखील मा. आयुक्तांचे अतुलनीय शौर्य रजत पदक बहाल करण्यात आले आहे.




Most Popular News of this Week

प्रकाश अंबेडकर के प्रस्ताव पर...

प्रकाश अंबेडकर के प्रस्ताव पर कांग्रेस एक कदम आगे, पवार और ठाकरे अंबेडकर का...

बार में काम करनेवाले कामगार...

बार में काम करनेवाले कामगार की हत्यानवी मुंबई। नवी मुंबई के जुहूगांव के एक...

होली मनाने गांव जाने वाले...

होली मनाने गांव जाने वाले यात्रियों की दिखी भीड़,नवी मुंबई। होली और रंगपंचमी...

हापुस के नाम पर ग्राहकों के...

हापुस के नाम पर ग्राहकों के साथ लूट, कार्यवाई की मांगनवी मुंबई। वाशी स्थित...

मनपा एंव विसपुते कॉलेज के...

मनपा एंव विसपुते कॉलेज के संयुक्त सहयोग से अपशिष्ट से टिकाऊ...

आचार संहिता का उल्लंघन करने...

आचार संहिता का उल्लंघन करने पर पनवेल में मामला दर्ज पनवेल। चुनाव आयोग...