लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 -मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक निरीक्षक संजयकुमार खत्री यांची निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

माध्यम कक्ष, मुंबई उपनगर जिल्हा

 

निवडणूक निरीक्षक संजयकुमार खत्री यांची

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट

 

मुंबई उपनगर: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 27- मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निरीक्षक संजयकुमार खत्री यांनी आज निवडणूक निर्णय् अधिकारी कार्यालयास भेट देत निवडणूक प्रक्रियेविषयी विविध सूचना केल्या.


निवडणूक निरीक्षक श्री. खत्री हे सन 2010 च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे सनदी अधिकारी आहेत. ते मतदारसंघात दाखल झाले असून त्यांनी आज 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट दिली. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी त्यांचे स्वागत केले.


यावेळी निरीक्षक श्री. खत्री यांनी मतदान प्रक्रिया, गृह मतदान, मतदान केंद्रांवरील सोयीसुविधा, मतदान यंत्रांची सरमिसळ, मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती घेत मार्गदर्शन केले. तसेच निरीक्षक श्री. खत्री यांनी स्ट्राँग रुमची सुरक्षा, मतमोजणी प्रक्रियेची तयारी याविषयीचा सुद्धा आढावा घेतला.



Most Popular News of this Week