हैडलाइन

28- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील उमेदवारांची तीन वेळेस होणार खर्चाची तपासणी -केंद्रीय खर्च निरीक्षक डॉ.सुनील यादव

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक

मुंबई उपगनर जिल्हा

२८ मुंबई उत्तर पूर्व


28- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील उमेदवारांची

तीन वेळेस होणार खर्चाची तपासणी

-केंद्रीय खर्च निरीक्षक डॉ.सुनील यादव


मुंबई: लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करीता 28- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचारादरम्यान करावयाच्या खर्चाबाबतचे नियम आणि मर्यादेबाबत केंद्रीय खर्च निरीक्षक डॉ. सुनील यादव यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले.  प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या नोंद वहीची तपासणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 


उमेदवारांना ९५ लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा आहे. त्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून, निर्भय आणि नि:पक्ष वातावरणात निवडणूक लढवण्याच्या सूचना करत श्री. यादव म्हणाले की,  ९ मे २०२४, १४ मे व १८ मे २०२४ या दिवशी २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे कार्यालय, पिरोजशहा नगर सांस्कृतिक सभागृह, विक्रोळी येथे तपासणी करण्यात येणार आहे. 


तपासणीसाठी उमेदवारांनी परिशिष्ट E-1, भाग ‘अ’, ‘ब’, ‘क’, खर्चाची मूळ प्रमाणक (Invoce, GST क्रमांक आदींसह परिपूर्ण), तपासणी दिनांकापूर्वी अद्ययावत बँक पासबुक/Bank Statement, सर्व परवाने (वाहन, रॅली आदी). वरील नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे खर्च लेखाच्या तपासणीसाठी उमेदवार/उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी विहीत वेळेत अभिलेख्यांसह निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 प्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही खर्च निरीक्षक सुनील यादव यांनी आहे. 

२८ - मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अंतिम वेळेनंतर या मतदासंघात २० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. या उमेदवारांना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना देण्यासाठी विक्रोळी येथील २८ -मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खर्च निरीक्षक सुनील यादव, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील, लेखा समन्वय अधिकारी सीताराम काळे आणि २० उमेदवार उपस्थित होते. 



Most Popular News of this Week

ठाकरेंचा मोर्चा, देशभर...

 वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

मोदी सरकार विरोधात शिवाजी...

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती...

CHEMEXCIL HOSTS 49TH EXPORT AWARDS CEREMONY IN MUMBAI TO HONOUR INDUSTRY...

The Basic Chemicals, Cosmetics & Dyes Export Promotion Council (CHEMEXCIL), set-up by the Ministry of Commerce & Industry, Government of India, successfully held its 49th Export Awards...

स्वातंत्र्यसैनिक वि. ना. पुरव...

चेंबूरमधील स्वातंत्र्यसैनिक, गांधीविचारांचे निष्ठावंत अनुयायी आणि...

महापौर रितू तावडे, उपमहापौर...

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी...