बेलापूर विधान सभा मतदार संघात विजय नाहटा यांना सुज्ञ मतदारांचा वाढता पाठिंबा.
नवी मुंबई। बेलापूर मतदार संघात विजय नाहटा यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आणि त्या नंतर मतदार संघातील वेगवेगळ्या समाजातील सुज्ञ मतदारांनी विजय नाहटा यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. आपला उमेदवार उच्च विभूषित असावा असं मानणारा नवी मुंबईत मोठा वर्ग आहे त्या वर्गाने नाहटा यांना पाठिंबा दिलाच आहे परंतु समाजातील वेगवेगळ्या जाती जमातीतील मतदारांनी विजय नाहटा यांना प्रथम पसंती दिली आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्व जाती धर्माचे मतदार एकवटले असून यावेळी विजय नाहटा यांनाच निवडून देणार आणि नवी मुंबईत बदल घडवणार असा चंग मतदारांनी बांधला आहे.यांचाच एक भाग म्हणून नाहटा यांच्या प्रचारात नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे.