आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली भक्तीवारी त्यांनी श्री. खंडेरायाचे, आई तुळजाभवानीचे व श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेतले...
नवी मुंबई – नवी मुंबईच्या आमदार सौ.मंदाताई विजय म्हात्रे यांनी नुकताच महाराष्र्टातील तिन भक्ती आणि शक्तीचे ठिकाण असलेल्या देवस्थानांना भेट देवुन मनोभावे दर्शन घेतले . हळदीच्या सोनेरी रंगात न्हालेलं मंगलमय ठिकाण म्हणजे जेजुरी, या ठिकाणी आल्यावरती एक वेगळीच सकारात्मकता जाणवते. सर्व दुःख दूर होऊन मनशांती मिळते असे पुणे येथील पुरंदर तालुक्यातील आपले आराध्य कुलदैवत श्री. क्षेत्र सोन्याची जेजुरी असलेले देवस्थान येथे भंडाऱ्याची उधळण करून व येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करत संपूर्ण म्हात्रे कुटुंबीयांसमवेत जेजुरी गडावर श्री. खंडेरायाचे दर्शन घेतले आणि श्री.खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुखी, समाधानी व निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली तसेच जनसेवेसाठी आणखीन बळ व उर्जा मिळो यासाठी मागणं केलं . तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता अनेक भक्तांच्या श्रद्धास्थानी आहे. तुळजापूर मंदिराच्या परिसरात आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होत. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेलं तुळजापूर हे कायमच माझ्यासाठी ऊर्जा आणि प्रेरणा देणारं स्थान राहिलंय. आई तुळजाभवानीचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहेत हा विश्वास आहे. आज सहकुटुंब तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक झाले असून भवानी मातेच्या कृपा आणि आशीर्वाद आम्हां सर्वांवर कायम राहो, सर्वांच्या इच्छा,मनोकामना पूर्ण होवोत अशी तुळजाभवानी मातेचरणी प्रार्थना केली. अशा प्रकारे श्री. क्षेत्र अक्कलकोट येथे अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री.स्वामी समर्थ महाराज यांच्या भेटीस जाण्याचा योग जुळून आला. आज श्री. स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट या ठिकाणी जाऊन स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले. स्वामींचा आशीर्वाद सदैव पाठिशी राहिला आहे, तसाच तो यापुढेही राहील याची खात्री आहे. स्वामी समर्थांच्या चरणी सर्वांना सुख, समृद्धी आणि समाधान लाभो तसेच जनसेवा आणि जनसेवेसाठी शक्ती मिळो अशी प्रार्थना केली. यावेळी माझ्या समवेत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष महेश इंगळे, मराठा वनवास यंत्राचे अध्यक्ष सुनील नागणे, मंदिरातील पुजारी, व इतर अक्कलकोट देवस्थानचे सदस्य, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते...!