राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने चेंबूर येथील समाज कल्याण ऑफिस वर धरणे आंदोलन
मुंबई/ वार्ताहर। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण ऑफिस वर धरणे आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांची मुख्यमंत्री वयश्री योजना बंद करण्यात आली हजारो नागरिकांनी फॉर्म भरले होते. इलेक्शनच्या अगोदर योजना सुरू होती आता ती बंद करण्यात आली. सरकारचे विरोधात आंदोलन घेण्यात आले होते. यावेळी दीपक सावंत चेंबूर तालुका अध्यक्ष, संजय कांबळे अध्यक्ष, उपाध्यक्ष मुंबई कुमुद जयकर, अध्यक्ष भालचंद्र दळवी, जगदीश दया, सामाजिक कार्यकर्ते वंदना सावंत, तालुका सचिव संदीप पडावे, प्रमोद कदम ,श्रीधर पांचाळ, जिल्हा सचिव आप्पा काकडे, महिला उपाध्यक्ष सायली पेडणेकर, उपाध्यक्ष योगिता भुजबळ वनिता गुडेकर, युवकांचे अध्यक्ष संजय कोळी सोबत अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.