कार्यतत्पर आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून रु. 5 कोटी 50 लाख उपलब्ध करून दिवाळे गावातील “स्मशानभूमीचे” भूमिपूजन संपन्न...
नवी मुंबई :- देशाचे लोकप्रिय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील संपूर्ण देशातील गावांचे स्मार्ट व्हिलेजचे स्वप्न तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या गाव दत्तक योजनेच्या अंतर्गत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांनी स्मार्ट व्हिलेजकरिता नवी मुंबईतील दिवाळे गाव हे दत्तक घेतले होते व नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून "दिवाळे गाव-स्मार्ट व्हिलेज" च्या अंतर्गत नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून बहुमान मिळालेल्या “दिवाळे गाव” या मच्छिमारांच्या गावाचा केवळ तीन वर्षांत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी कायापालट केला आहे. याच अनुषंगाने दिवाळे गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्काराकरिता असलेली “स्मशाभूमी” हि निकृष्ट झाली होती हे लक्षात घेऊन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून रु. 5 कोटी 50 लाख उपलब्ध करून दिवाळे गावात सुसज्ज व सर्व सुविधायुक्त अशी “स्मशानभूमी” चे भूमिपूजन गुरुवारी दिवाळे ग्रामस्थांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सदर स्मशानभूमी परिसरात अंत्यसंस्काराकरिता उत्तम दर्जाचे दहन शेड, प्लॅट फॉर्म, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था, भांडार खोली, प्रसाधन गृह, सुरक्षा रक्षक केबिन तसेच इतर सुविधा दिवाळे गावातील नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
तसेच दिवाळे गावात महत्वकांशी सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी देखील आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली व दिवाळे गावात ज्या काही समस्या आहेत त्या देखील ऐकून घेतल्या व सदरच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, दिवाळे गावातील भूमिपुत्रांसाठी रस्ते, पाणी, सोलर हायमास्ट, आधुनिक जेट्टी, मासे विक्रीसाठी सर्व सुविधायुक्त मासळी मार्केट, वाहनतळ व्यवस्था, नागरिकांसाठी उद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र अशा अनेक सुख सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. शहराचा विकासा बरोबर ही मूळ गावांचा विकास व्हावा व गावातील नागरिकांचा राहणीमान व दर्जा उंचावण्यासाठी जो आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पर्यंत केला आहे तो खरच दिवाळे गाव हा स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने जात आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी देशातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा, ग्रामीण भागातील नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रत्येक गाव हे स्मार्ट व्हिलेज तयार करावे असे स्वप्न साकारले आहे असून आता हे गाव स्मार्ट व्हिलेज म्हणून तयार झाले आहे. त्यामुळे सदर दिवाळे गावाला आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून सुखसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे दिवाळे गावातील एक नवीन स्मशानभूमीचे भूमिपूजन झाले असून एक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य आज पार पडल्याने दिवाळे गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे दिवाळे गावातील नागरिकांनी आभार मानले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत फगेवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष अनंता बोस, खांदेवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष रमेश हिंडे, मच्छीमार संस्थेचे अध्यक्षडोलकर मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष तुकाराम कोळी, एकविरा महिला मच्छीमार संस्थेचे अध्यक्षा सुरेखा कोळी, मानाची पालखी दिवाळे कोळीवाड्याची अध्यक्ष करेश मुंबईकर, सोमनाथ कोळी, माजी नगरसेवक दि.ना.पाटील, विष्णू कोळी, गंगेश कोळी, चंद्रकांत पाटील, सुरेश कोळी, मनीष बिजलानी, करणानी, समाजसेवक सुजित कोळी, समाजसेवक कुंदन म्हात्रे, समाजसेविका ज्योती पाटील, श्याम कोळी, संजय कोळी तसेच बेलापूर विभागाचे कार्यकारी अभियंता वाघचौरे, उपअभियंता चौरे, बेलापूर विभागाचे विभागीय अधिकारी डॉ. अमोल पालवे व दिवाळे गावातील असंख्य नागरिक व महिला भगिनी उपस्थित होते.