हैडलाइन

एक शाम वीर जवानों के नाम या भव्य कार्यक्रमास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद.



एक शाम वीर जवानों के नाम या भव्य कार्यक्रमास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद.

वीर जवान फाउंडेशनचा शाहिद जवानांसाठी स्तुत्य उपक्रम 


शहीद दिवसाचे आवचित्य साधून वीर जवान फाउंडेशनच्या वतीने श्री. षन्मुखानंद हॉल सायन मुंबई येथे एक शाम वीर जवानों के नाम या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक श्री. विजय नाहटा साहेब यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेश काकडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे  दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध सिने पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या हिट्स ऑफ  सुदेश भोसले यांच्या सदाबहार हिंदी मराठी गाण्यांचा ऑर्केष्ट्रा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला कमांडर सोलंकी, कमांडो मेजर इंद्रजीत, वीर जवान फाउंडेशन चे संस्थापक  निवृत्त सनदी अधिकारी श्री. विजय नाहटा व वीर जवान फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुरेश काकडे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात देशभक्ती गीताने करण्यात आली तसेच पार्श्वगायक श्री.सुरेश भोसले आणि बेला सुलाखेने आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतली. विरजवान फाउंडेश या संस्थेच्या माध्यमातून वीरजवान शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने एक शाम जवानोंके नाम  ह्या कार्यक्रमाचे  दरवर्षी आयोजन करण्यात येत असते.त्या नुसार याही वर्षी एक शाम वीर जवानोंके नाम या कार्यक्रमाचे करण्यात आले होते.मुंबई  येथील श्री षन्मुखानंद हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास हजारो प्रेक्षकांनी उपस्थिती नोंदवली होती.आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत श्री विजयजी नाहटा साहेब व अध्यक्ष श्री सुरेश काकडे व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. शेवटी राष्ट्रगानने कार्यक्रमाची समापन करण्यात आले.



Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस...

देश का माहौल बदल चुका है। जनता अब भाजपा-मोदी-शाह सरकार से सवाल पूछ रही है और...

तिरंगा कापताना लाज वाटली नाही...

केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

पादचारी प्रथम अभियानाच्या...

‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने पादचाऱ्यांसाठी रस्ते व...

नवी मुंबई महापालिका...

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता...