हैडलाइन

“टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे मुंबईत जंगी स्वागत”

टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघावर मात करून जगज्जेतेपदावर नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. देवनार येथील त्यांचे निवासस्थान असलेल्या सोसायटीत माजी खासदार राहुल शेवाळे देखील राहतात. मंगळवारी दुपारी निवासस्थानी परतलेल्या सूर्यकुमार यादव यांचे शेवाळे कुटुंबीय आणि इतर सोसायटी सदस्यांच्या वतीने ढोलताशांच्या गजरात  स्वागत करण्यात आले.


दैदिप्यमान कामगिरीबाबत पुष्पगुच्छ आणि शाल - श्रीफळ देऊन शेवाळे यांनी त्यांचे अभिनंदन केले त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी त्यांचे औक्षण करण्यात आले. या स्वागतासाठी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 


यावेळी बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, "भारतीय संघाने क्रिकेटच्या टी 20 विश्वचषकावर आपले नाव कोरले, तो क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता. या जगज्जेत्या संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव आपल्या घरी परतले. त्यावेळी आमच्या सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या आणि शिवसैनिकांच्या वतीने त्यांचे स्वागत करणे, हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. टीम इंडियाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!"





Most Popular News of this Week

स्वामी समर्थांच्या प्रकट...

भांडुप पश्चिम येथील माता रमाबाई नगर आणि साई हिल परिसरात श्री स्वामी समर्थ...

मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या...

मुंबई शहर उपनगरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली असून पालिकेच्या...

मुंबई काँग्रेसचे एलपीजी गॅस...

अमेरिका इराण युद्धामुळे गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा मुंबईसह राज्यात जाणवू...

सोनखार-पामबीचमध्ये ‘संयुक्त...

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोनखार-पामबीच परिसरात हिंदू नववर्षाचे...

INDIAN NAVY CONTINUES IOS SAGAR INITIATIVE TO STRENGTHEN MARITIME PARTNERSHIP...

 Reaffirming India’s commitment to collaborative maritime security in the Indian Ocean Region, the second edition of Indian Ocean Ship (IOS) SAGAR commenced on 16 Mar 2026 .The Indian Navy...

मुख्य सचिवांनी घेतली...

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल  यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु...