हैडलाइन

मैत्री पार्क एस.टी. स्टँड स्थलांतर आंदोलन अखेर रद्द; MMRDA कडून अधिकृत पत्र जारी

चेंबूरमधील मैत्री पार्क एस.टी. स्टँड स्थलांतराच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन अखेर रद्द करण्यात आले आहे. एमएमआरडीएकडून अधिकृत पत्र जारी करत याबाबत मोठा दिलासा देण्यात आला आहे.

एमएमआरडीएच्या परिवहन व दळणवळण विभागाने दिलेल्या पत्रानुसार, सध्या कार्यरत असलेला मैत्री पार्क एस.टी. बस थांबा हा छत्रपती शिवाजी महाराज चौक मेट्रो स्थानकाच्या २५० मीटर परिसरात येत असल्याने भविष्यात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन बस स्टँड स्थलांतराचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.


मात्र, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा स्थलांतर प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे की, सध्यास्थितीत मैत्री पार्क येथील एस.टी. बस थांबा स्थलांतरित करण्याचे कोणतेही नियोजन प्राधिकरणाकडे नाही.


या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी आणि रिक्षाचालक संघटनांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रस्तावित आंदोलनही आता रद्द करण्यात आले आहे. मैत्री पार्क परिसरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले आहेत.


Most Popular News of this Week

प्रियदर्शिनी पार्कमध्ये योग...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रोज दोन तास योगा करतात मी सुद्धा रोज अर्धा तास...

जय पवार यांची मान्सूनच्या...

महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि...

कोविडनंतर रोजगार गमावलेल्या...

मुंबई मध्ये गेली १३५ वर्ष डबेवाला कामगार वर्ग काम करतो आहे. परंतू कोव्हिड व...

मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड....

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना मुंबई बाहेर न जाता मुंबईत समायोजन करा,...

मुंद्रा से मुंबई-गोवा समेत 8...

अडानी मुंद्रा एयरपोर्ट ने स्टार एयर के साथ रणनीतिक साझेदारी करते हुए मुंबई...