हैडलाइन

वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेती डॉ. ज्योती देऊरकर यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारांनी केला सत्कार ;दिल्या शुभेच्छा

'पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६' मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या सुपुत्री डॉ. ज्योती (पूजा) देवराव देऊरकर यांनी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रदेश कार्यालयात त्यांचा सत्कार करत अभिनंदन केले. 

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जनता दरबारसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या. दर मंगळवारी दुपारनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जनता दरबार राष्ट्रवादी भवनमध्ये पार पडतो. आपल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांची प्रचंड गर्दी आजही पहायला मिळाली. प्रत्येकाच्या समस्या शांतपणाने जाणून घेत त्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न सुनेत्रा अजित पवार या करताना दिसत होत्या. 


गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या 'पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६'  मध्ये डॉ. ज्योती (पूजा) देवराव देऊरकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. डॉ. ज्योती देऊरकर यांनी 'ट्विस्टिंग बॉडी इव्हेंट' (Twisting Body Event) या प्रकारात (वयोगट ३५ ते ४५ वर्षे) उत्कृष्ट कामगिरी नोंदवत हे सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे.

या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत मिळवलेल्या या अभूतपूर्व यशामुळे केवळ आपल्या देशाचेच नव्हे, तर महाराष्ट्र राज्याचे आणि विशेषतः चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल झाले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा तिरंगा फडकवण्यामागे डॉ. ज्योती देऊरकर यांची अनेक वर्षांची कठोर मेहनत, जिद्द आणि योगासनाप्रती असलेली अपार निष्ठा समोर आली आहे.

 आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची डॉ. ज्योती देऊरकर यांनी भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यासोबत ही भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन डॉ. ज्योती देऊरकर यांचा सत्कार केला.


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस...

देश का माहौल बदल चुका है। जनता अब भाजपा-मोदी-शाह सरकार से सवाल पूछ रही है और...

तिरंगा कापताना लाज वाटली नाही...

केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

पादचारी प्रथम अभियानाच्या...

‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने पादचाऱ्यांसाठी रस्ते व...

नवी मुंबई महापालिका...

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता...