हैडलाइन

आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण; टी-20 मुंबई लीगसाठी संघ सज्ज

मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स संघाच्या नव्या जर्सीचे भव्य अनावरण करण्यात आले. आगामी टी-20 मुंबई लीगच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सोहळ्याला क्रिकेटप्रेमी आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी संघाचे आयकॉनिक खेळाडू आणि पुरुष संघाचे कर्णधार सरफराज खान, महिला संघाची कर्णधार हुमैरा काझी, मेंटॉर प्रवीण आमरे तसेच लाया फ्रान्सिस उपस्थित होते. टीमचे मालक राम जरोडिया आणि आदिती आकाश जरोडिया यांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला.


कार्यक्रमादरम्यान संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. तसेच आगामी टी-20 मुंबई लीगमध्ये आकाश टायगर्स दमदार कामगिरी करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पुरुष संघ सोमवारी एमएससी मराठा रॉयल्सविरुद्ध तर महिला संघ बुधवारी सोबो मुंबई फाल्कन्सविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.


युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि क्रिकेटमधील नव्या प्रतिभांना प्रोत्साहन देणे हेच संघाचे ध्येय असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी संपूर्ण संघाला आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा देत विजयासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


Most Popular News of this Week

प्रियदर्शिनी पार्कमध्ये योग...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रोज दोन तास योगा करतात मी सुद्धा रोज अर्धा तास...

जय पवार यांची मान्सूनच्या...

महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि...

कोविडनंतर रोजगार गमावलेल्या...

मुंबई मध्ये गेली १३५ वर्ष डबेवाला कामगार वर्ग काम करतो आहे. परंतू कोव्हिड व...

मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड....

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना मुंबई बाहेर न जाता मुंबईत समायोजन करा,...

मुंद्रा से मुंबई-गोवा समेत 8...

अडानी मुंद्रा एयरपोर्ट ने स्टार एयर के साथ रणनीतिक साझेदारी करते हुए मुंबई...

महानगरपालिका आरोग्य...

महानगरपालिका रुग्णालयांमधील रुग्णसेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि...