हैडलाइन

राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात संपन्न

शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या वतीने इयत्ता KG, Sr. KG व इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ दिनांक १५ जून २०२६ रोजी गुरुकुल इंग्लिश स्कूल, सायन कोळीवाडा येथे मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला.

शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष सुमित कुंडलिक वजाळे यांच्या आवाहनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पेन्सिल व गोड खाऊचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला शुभेच्छा देण्यात आल्या.


सदर कार्यक्रम मा. राहुल शेवाळे  (शिवसेना सरचिटणीस तथा खासदार)यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडला.

सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती निशिकांत पाटोरे (शिवसेना सह लोकसभा प्रमुख, दक्षिण मध्य मुंबई) आणि मंगेश सातमकर साहेब (शिवसेना विभाग प्रमुख) आणि शिवसेना वरिष्ठ पदाधिकारी कृष्णा नेलगे जी आनंद कांबळे जी ज्योती ताई देवेंद्र किरण ठोके (जिल्हा उपाध्यक्ष ) मा.शाखा प्रमुख निलेश भोसले मा. महिला शाखा प्रमुख सुजाता रायभोळे उपस्थित होते.


मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

या प्रसंगी शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष मधुसूदन रामचंद्र रणदिवे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.

'शिक्षण हीच खरी शक्ती' हा संदेश देत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. 


Most Popular News of this Week

सहकारी साखर कारखान्यांसाठी...

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी...

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५...

लोकनेते आदरणीय गणेश नाईक...

मंडळाच्या भूमिकेनुसार शिरवणे गावातील स्थानिक गोविंदा पथकांच्या द्वारेच...

माजी खासदार समीर भुजबळ...

एसआयआर मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान पात्र असूनही ज्या नागरिकांची नावे...

‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२७...

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ च्या सामाजिक,...

पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या...

नवी मुंबईतील सानपाडा येथे साईभक्त सेवा मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव...